Deepika Padukone Oscar 2023 entry trolled as a Brazilian model
Deepika Padukone Oscar 2023 entry trolled as a Brazilian model  
मनोरंजन

Deepika Padukone : 'आम्हाला वाटलं ब्राझिलियन मॉडेल आहे', सुरक्षा एजन्सीची चूक, चाहत्यांचा संताप!

सकाळ डिजिटल टीम

Deepika Padukone Oscar 2023 entry trolled as a Brazilian model : ऑस्करमध्ये नाटू नाटूचा गौरव झाला खरा पण त्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे तो काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. आरआऱआरवरून भाषिक आणि प्रांतिक वाद तयार झाला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी केलेल्या ट्विटवरुन वाद झाला आहे, त्यात दिग्दर्शक एस एस राजामौली यांना ऑस्कर समितीनं मागील रांगेत बसवल्यानं चाहत्यांचा संताप झाला आहे.

अशातच आणखी एका गोष्टीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणवरुन वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये दीपिकाच्या वाट्याला खास भूमिका होती. त्यासाठी आकर्षक वेशभूषेत गेलेल्या दीपिकाला सुरक्षारक्षकांडून एका समस्येला सामोरं जावं लागलं आहे. त्याचा परिणाम असा की, ती गोष्ट जेव्हा तिच्या चाहत्यांना, नेटकऱ्यांना कळली तेव्हा त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

ऑस्करमध्ये आलेल्या काही फॉरेन एंजेन्सीनं दीपिकाला ब्राझीलियनं मॉडेल डिझायनर कॅमिला अल्वेझ म्हणून ओळखलं. त्याचे काही स्क्रीन शॉट्स व्हायरल झाले आहेत. त्यावरुन वेगळ्याच वादाला आणि चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. ऑस्करमध्ये सहभागी झालेल्या दीपिकाचे फोटो हे तिच्या नावानं नव्हे तर ब्राझीलियन मॉडेलच्या नावानं व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे दीपिकाचे चाहते नाराज झाले आहेत.

ऑस्करच्या सोहळ्यात दीपिकाच्या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. भारताकडून अशा प्रकारचा बहुमान मिळवणारी दीपिका ही पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. त्यामुळे भारतातूनही तिच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु होता. तिच्या भाषणालाही देखील चाहत्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र अशात काही इंटरनॅशनल एजेंसीनं दीपिकाला ओळखण्यात चूक केली त्यामुळे गोंधळ उडाला. तिला कॅमिला अल्वेस म्हणून काहींनी ओळखलं. जी अभिनेता मॅथ्यु मॅककॉनगे यांची पत्नी आहे.

यावर एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, तुम्हाला दीपिका कशी माहिती नाही. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ७२ मिलियन आहे. ऑस्करच्या मंचावर जेव्हा दीपिकाचे मनोगत सुरु झाले तेव्हा थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी तिची स्तुती केली होती. प्रेक्षकांनी तिला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली होती.

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दीपिकाला ओळखण्यात चूक केल्यानं तिच्या चाहत्यांनी संबंधित एजन्सीला प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. तुम्हाला भारताची प्रसिद्ध अभिनेत्री कशी काय ओळखू आली नाही असा प्रश्न त्यांनी विचारले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT