Deepika Saffron controversy esakal
मनोरंजन

Deepika Saffron controversy: अक्षयचा 'केसरीया' चालतो, मग शाहरूखच का खटकतो?'

बॉलीवूडमध्ये किंग खान शाहरुखचा दबदबा मोठा आहे. तो सध्या त्याच्या पठाण नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Deepika Padukone Pathan movie Saffron contraversy : बॉलीवूडमध्ये किंग खान शाहरुखचा दबदबा मोठा आहे. तो सध्या त्याच्या पठाण नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण ही त्याची सह अभिनेत्री आहे. त्याचे बेशरम नावाचे गाणे व्हायरल झाले आहे. मात्र ते वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

दीपिकानं बेशरम नावाच्या गाण्यामध्ये बिकीनी परिधान केली आहे. जी अनेकांच्या वादाचा विषय ठरताना दिसत आहे. आता तर मध्यप्रदेशचे गृहमंत्री यांनी देखील दीपिकावर टीका केली आहे. दीपिकानं भगव्या रंगाची बिकीनी परिधान करुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. अशातच शाहरुखवर देखील नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो हमखास मंदिरामध्ये जातो. हिंदू धर्मियांना ज्या गोष्टींविषयी प्रेम वाटते ते करतो.

शाहरुखवर होणारी टीका ही त्याच्या चाहत्यांना आवडलेली नाही. त्यांनी शाहरुखची बाजू घेतली आहे. शाहरुखला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता तर सोशल मीडियावर यापूर्वी कोणत्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी भगव्या रंगाची कपडे परिधान केली आहेत त्यांच्या पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, कतरिना कैफ, रविना टंडन, सारा अली खान यांना भगव्या रंगाची कपडे घालून बोल्ड सीन दिले आहेत. याची आठवण करुन दिली आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शाहरुखवर टीका करताना यापूर्वी देखील बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी कशाप्रकारे भगव्या रंगाची कपडे परिधान केली होती. त्यामध्ये अक्षय कुमारच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यानं त्याच्या केसरिया चित्रपटामध्ये पगडी परिधान केली होती. त्याचा रंग केसरी होता. त्यावरुन तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याशिवाय रविना टंडन, कतरिनानं देखील भगव्या रंगाची कपडे परिधान केली होती. त्यांनी तर बोल्ड सीन देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT