Deepika met Sanjay leela bhansali 
मनोरंजन

दीपिकाने घेतली भन्साळींची भेट, बी-टाउनमध्ये चर्चेला उधाण !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोन कोणत्याना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ब्लॉकबस्टर चित्रपट 'पद्मावत' नंतर ती चित्रपटात दिसली नाही. पण, मुलाखती, एअरपोर्ट लुक, अवॉर्ड आणि सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ती चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये असते. आता मात्र ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. नुकतेच दीपिका तिच्या आवडत्या दिग्दर्शकाला भेटून आली. दुसरं तीसरं कोणी नसून ते दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी. दीपिका त्यांना भेटल्यामुळे तिच्या पुढील चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे.

निर्माते आणि दिग्दर्शक भन्साळी यांनी 'इन्शाअल्लाह' हा चित्रपट करणे रद्द केले आहे. त्यानंतर दीपिका शनिवारी (28 सप्टेंबर) भन्साळी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेली होती. 'स्पॉटबॉय' या बॉलिवूड संबंधीत अकाउंटने दीपिकाचे भन्साळी यांना भेटायला गेली असतानाचे फोटो अपलोड केले आहेत. भन्साळी आणि दीपिका परत एकत्र काम करणार का? भन्साळी नव्या कोणत्या चित्रपटासह दीपिकासह काम करणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

भन्साळी यांनी दीपिका आणि रणवीर सिंगसह एकुण तीन ब्लॉकबस्टर सिनेमे केले. राम लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशी हॅट्रीक या जोडीने केली. दीपिका आणि भन्साळी यांच्या मिटिंग मध्ये नक्की काय झाले याची उत्सुकता सर्वांनाच लागुन आहे. 

दीपिकाने नुकतचं तिचा आगामी सिनेमी 'छपक' चं शुटिंग पूर्ण केलं आहे. मेघना गुलजार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, या शिवाय ती कबीर खानच्या '83' या चित्रपटातदेखील  दिसणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : लग्न जुळत नसल्याने युवकाने संपवलं जीवन

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT