Deepika Singh Mother Tests Positive For Coronavirus Ask Help From Delhi Government 
मनोरंजन

या अभिनेत्रीच्या कुटुंबातील इतक्या सदस्यांना करोनाचा धोका, सरकारकडे मागतीय मदत

सकाळवृत्तसेवा

'दिया और बाती’ मधील संध्या बिंदणीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका सिंह हिच्या आईला करोनाची लागण झाली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. सोबतच तिने दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. दीपिकाच्या आईची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांना रिपोर्ट न दिल्यामुळे त्यांच्या उपचारांमध्ये अडथळा येत असल्याचे दीपिकाने यावेळी सांगितल आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी दिपिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये तिने तिच्या कुटुंबियांची आणि आईच्या परिस्थितीबद्दल सांगितलं की, काही दिवसांपूर्वी माझ्या आईची लेडी हार्डिंग हॉस्पिटल येथे करोना चाचणी करण्यात आली.यावेळी तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.परंतु अद्यापही हे रिपोर्ट आमच्या हातात मिळालेले नाहीत.

या विषयासंदर्भात रुग्णालयात संपर्क केला असता त्यांनी केवळ रिपोर्टसचे फोटो काढण्यास सांगितले. मात्र रिपोर्ट हातात दिले नाही. त्यामुळे रिपोर्ट अभावी माझ्या आईवर कोणत्याही रुग्णालयात उपचार करत नाही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकार कृपया माझी मदत करा. तसेच दिल्लीत माझं मोठं कुटुंब आहे. जवळपास ४५ लोकं या कुटुंबात राहतात. त्यामुळे आईला झालेल्या करोनाची लागण कुटुंबीयांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया माझी मदत करा.

दरम्यान, दिल्लीतील कोणत्याच रुग्णालयात जागा नसल्यामुळे तिच्या आईला कोणतंही रुग्णालय अॅडमीट करुन घेण्यास तयार नाही. त्यामुळे सध्या घरीच तिच्या आईवर उपचार सुरु असल्याचं सांगत तिने चिंता व्यक्त केली आहे.असे दीपिकाने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापुरात बेल्टने मारहाण करत 20 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीती घालून दोन वर्षांपासून ठेवले शारीरिक संबंध

Chhatrapati Sambhajinagar: व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले; जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बोलावले;दागिन्यासह रोख रक्कम पळविली

Latest Marathi News Live Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता

Sangola Accident: घराच्या थोड्याच अंतरावर काळाचा घाला! टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार; सांगोला-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

SCROLL FOR NEXT