Deepti Naval And Smita Patil  esakal
मनोरंजन

Deepti Naval मैत्रीण स्मिता पाटीलच्या आठवणीने भावूक, आयुष्याच्या या वळणावर..

वेळोवेळी त्या आजही आपल्या जिवलग मैत्रीणीची आठवण काढत असतात.

सकाळ डिजिटल टीम

शबाना आझमी , दीप्ती नवल आणि स्मिता पाटील या अभिनेत्रींचा चित्रपट उद्योग विश्वात एकापेक्षा एक चित्रपट आहेत. उत्कृष्ट अभिनयाची चर्चा होते तेव्हा या तिघींचेही नावे समोर येतात. मात्र अभिनयाबरोबरच या तिघी आणखी एका गोष्टीसाठी ओळखल्या जातात. ती आहे मैत्री. या तिघीही चांगल्या मैत्रीण आहेत. त्यांनी अभिनयच नाही, तर उद्योगात मैत्रीचेही उदाहरण सर्वांसमोर सादर केले आहे. मात्र अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) फार लवकर जगाला सोडून गेल्या. दुसरीकडे चाहत्यांबरोबरच मैत्रीण दीप्ती नवल आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्यामध्ये आठवणीच्या रुपात त्या आजही जिवंत आहेत. (Deepti Naval Remembering Her Best Friend Smita Patil)

वेळोवेळी त्या आजही आपल्या जिवलग मैत्रीणीची आठवण काढत असतात. नुकतेच दीप्ती नवल यांनी एक जुने छायाचित्र शेअर केले आहे. त्यात त्या तिघीही दिसत आहेत. अभिनेत्री-दिग्दर्शक दीप्ती नवलने (Deepti Naval) आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक जुने छायाचित्र शेअर केले आहे. त्यात दीप्ती नवल, शबाना आझमी आणि स्मिता पाटील दिसत आहेत. तिघीही वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.

लिहिली भावूक पोस्ट

छायाचित्र शेअर करत दीप्ती नवलने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पोस्टवरुन दिसते की त्या आजही स्मिता पाटील यांचे त्यांच्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे स्थान आहे. दीप्ती नवल लिहितात, जीवनाच्या या वळणावर स्मिताच्या नसण्याची जाणीव होत आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

या छायाचित्रावर सेलेब्स आणि चाहत्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गुल पनागने छायाचित्रावर हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. एक यूजर म्हणतो, ब्यूटी विथ ब्रेन. मला हे छायाचित्र खूपच आवडले आहे, अशी प्रतिक्रिया एकाने नोंदवली. तुम्हा तिघींची जोडी सदा सर्वकाळ माझी आवडती जोडी आहे. स्मिता पाटीलने राज बब्बर यांच्याशी विवाह केला होता. मुलगा प्रतीक बब्बर याला जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतर त्यांचे निधन झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mundhwa land Case: मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक; अमेडिया कंपनीसोबत व्यवहार झाल्याचं उघड

Latest Marathi News Live Update : इंडिगो एअरलाईन्सच्या कॅबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफचे कामबंद आंदोलन

Sangli News : कडाक्याची थंडीही रोखू शकली नाही शिराळकरांना; दुपारपर्यंत तब्बल ६६.७३% मतदानाची नोंद

T20I World Cup 2026 साठी भारताच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण; ब्रँड अँबेसिडर रोहित शर्माचीही उपस्थिती; पाहा Video

Horoscope Prediction : येत्या चार दिवसांमध्ये पालटणार 3 राशींचं नशीब ! शनी देवांच्या कृपेने घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT