akshay kumar 
मनोरंजन

दिल्ली पोलिस जवानाने गायलं 'तेरी मिट्टी' गाणं, अक्षयने स्तुती करत म्हटलं...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत अक्षय कुमारने ब-यापैकी पुढकार घेतल्याचं दिसून आलं होतं. एप्रिलमध्ये अक्षय कुमारने करण जोहरसोबत अनेक सेलिब्रिटींच्या सहाय्याने कोरोना सारख्या महारोगराई दरम्यान लोकांच्या सुरक्षिततेसाठी काम करणा-या डॉक्टर्स आणि इतर योद्धांचं कौतुक केलं होतं. त्यांनी कोरोना योद्धांना सलाम करण्यासाठी अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमातील 'तेरी मिट्टी' गाण्याचा आधार घेतला होता. नुकतंच दिल्ली पोलीसमधील एका जवानाने हे गाणं गायलंय आणि त्याच्या व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर देखील केला आहे. 

दिल्ली पोलीस रजत राठौर यांनी अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमातील 'तेरी मिट्टी' हे गाणं गायलंय. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलंय, 'तेरी मिट्टी हे केवळ गाणं नाही तर ह्या माझ्या भावना आहेत. माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर माझं खूप कौतुक झालं आहे. मात्र मी अक्षय कुमार सरांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे.'

विशेष म्हणजे रजत राठौर यांची ही इच्छा अक्षय कुमारने पूर्ण केली आहे. अक्षयने त्याच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने या पोलिस जवानाचं कौतुक केलं आहे. अक्षयने लिहिलंय, 'तेरी मिट्टी हे एक असं गाणं आहे जे नेहमीच माझ्या अंगावर शहारा आणतं. भले मी कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी..यावेळी ही माझ्या भावना काही वेगळ्या नाही आहेत. हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी धन्यवाद रजत जी.'

अक्षय कुमारच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'सूर्यवंशी' हा सिनेमा कोरोना व्हायरसच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित असलेल्या या सिनेमात अक्षयसोबत कतरिना देखील दिसून येणार आहे. याशिवाय अक्षयच्या आगामी सिनेमांमध्ये 'बच्चन पांडे', लक्ष्मीबॉम्ब' आणि 'बेल बॉटम' सारखे सिनेमे आहेत.   

delhi cop sings akshay kumar teri mitti and actor is all praise for him  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT