Jacqueline Fernandez   sakal
मनोरंजन

Jacqueline Fernandez : मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आल्यानंतर ती अडचणीत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jacqueline Fernandez : मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर केला आहे. दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जॅकलिनला जामीन मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय जॅकलिनला देश सोडता येणार नाहीये. सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आल्यानंतर ती अडचणीत आली आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलीनविरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे.

‘सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून दिल्ली पोलिसांद्वारा अटक होईपर्यंत जॅकलीन फर्नांडिसशी नियमित संपर्कात होता’ असे एजन्सीने तपासात आढळल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणी यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. दिल्ली न्यायालयात दोन आरोपपत्रेही दाखल केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hybrid Home Loan New Scheme: होम लोनच्या EMI ची चिंता मिटणार? ६५ महिन्यांसाठी व्याजदर लॉक करता येणार; 'या' बँकेची नवी हायब्रिड योजना आहे तरी काय?

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Iphone update: भारतात लाँच होणार Apple Pay; iphone युजर्सना मिळणार 'टॅप अँड पे' सुविधा!

Ajinkya Rahane निवृत्तीनंतर घेणार 'फ्रेश गार्ड'; भारत-श्रीलंका मालिकेतून करणार नवी सुरुवात!

Maharashtra Kashmir Partnership: महाराष्ट्र–काश्मीर फलोत्पादन भागीदारीला नवी चालना; द्राक्ष-सफरचंद तंत्रज्ञान देवाणघेवाणीतून शेतकऱ्यांच्या विकासाला गती

SCROLL FOR NEXT