Demand for divorce of Virat Kohli and Anushka Sharma 
मनोरंजन

विरुष्काच्या जोडीने घ्यावा घटस्फोट; कारण, वाचून बसेल धक्‍का...

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाला आता तीन वर्ष होत आहेत. अनेकांना आवडणारी ही जोडी विरुष्का नावाने ओळखली जाते. हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर रोमॅंटिक फोटोंमुळे चर्चेत असतात. परंतु, सध्या ट्‌वीटवर विरुष्कांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. तसा ट्रेंड सुरू झाला आहे. 

अनुष्काची बहुचर्चित वेब सीरिज "पाताललोक' रिलीज झाल्यानंतर भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विरुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली होती. भाजप आमदार गुर्जर यांनी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो गुन्हेगारासोबत वापरून देशद्रोहाचे काम केल्याचा आरोप अनुष्कावर केला होता. तसेच गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे, असे म्हटले आहे. या वादावरून आमदार गुर्जर यांनी विरुष्कांनी घटस्फोट द्यावा अशी मागणी केली होती. 

काही दिवसांपूर्वी लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी "पाताललोक' वेब सीरिजमुळे निर्माती अनुष्का शर्माला लीगल नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला गेल्याचा आरोप केला आहे. ज्यात नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

वीरेन सिंह गुरुंग यांनी असे सांगितले की, बेवसीरिजच्या पहिल्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तीन मिनीट आणि 41 सेकंदांच्या चौकशी दरम्यान एक महिला पोलिस संबंधित नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते. याकारणामुळे ट्‌वीटवर विरुष्कांच्या घटस्फोटांचा ट्रेंड सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT