lata mangeshkar  
मनोरंजन

लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी राज्यसरकारकडून 100 कोटी

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहिर केला. यामध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली पर मोठ्या निधीची घोषणा केली आहे. त्यांनी मुंबईतील याठिकाणी कलिना विद्यापीठात लता मंगेशकर विद्यालयासाठी 100 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे सोशल मीडियावर दीदींच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीदींच्या स्मारकाविषयी घोषणा करण्यात आली होती. त्यावरुन वादही झाला होता. मात्र अजित पवारांनी यावेळी या कामी मोठा निधी देऊन चाहत्यांना, संगीतप्रेमींना आणि संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात स्मारक तयार करण्यात यावे म्हणून वाद सुरु होता. त्यावर अनेक राजकीय व्यक्तिंनी पुढाकार घेऊन हे विद्यापीठ व्हावे म्हणून पुढाकार घेतला होता. अखेर त्याठिकाणी स्मारक करण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती. आता पवार यांनी लता मंगेशकर विद्यालयासाठी शंभर कोटींची तरतूद करुन संगीतप्रेमींना दिलासा दिला आहे. यंदाच्या बजेटमध्ये मंगेशकर यांना श्रद्धांजलीपर महत्वाची घोषणा होईल असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला होता. शिवाजी पार्कमधील स्मारकाला भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असताना भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली होती.

प्रकाश आंबेडकर यांनी, “ शिवाजी पार्क हे एकमेव मैदान आहे जिथं खेळता येतं. इथं शाळा, कॉलेजचे, क्लबचे सामने होतात. व्यक्तींचं स्मारक करायचं असेल तर अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जागा आहेत. मुलांच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करावं असं मला वाटत नाही,” अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT