deputy cm devendra fadanvis wife amruta fadanvis in bus bai bus show on zee marathi sakal
मनोरंजन

'लोक तुम्हाला मामी म्हणतात' यावर अमृता फडणवीसांनी दिलं फर्मास उत्तर..

झी मराठीवर नव्याने सुरू झालेल्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली.

नीलेश अडसूळ

Amruta fadanvis : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या आगामी कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या आधी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस 'बस बाई बस' मध्ये सहभागी होणार आहेत. याचा एक भन्नाट प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये अमृता फडवणीस यांना थेट 'मामी' या विशेषणावरुन प्रश्न विचारण्यात आला आहे. हा विडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. (deputy cm devendra fadanvis wife amruta fadanvis in bus bai bus show on zee marathi)

यावेळी अमृता फडणवीस यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. अमृता फडणवीस देखील त्यांच्या विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. त्यांना खूप ट्रोलही केलं जातं. याच ट्रॉलर्सने अमृता यांना 'मामी' असे विशेषण दिले आहे. त्याच संदर्भात एका महिलेने प्रश्न विचारला आहे. 'देवेंद्र यांना 'माजी मुख्यमंत्री’ म्हणजे 'मामु' असं म्हटलं जातं तर तुम्हाला 'मामी' म्हणतात तर तुम्हाला कसं वाटतं' असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, 'मला तर फार मजा येते,' त्यांचं हे उत्तर ऐकून सर्वच जन चकित होतात. (amruta fadanvis reacts on mami)

तर पुढे त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवून संवाद साधायला सांगितले जाते. त्यावेळी त्या म्हणतात, 'अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे? आसामला नेताय का?' असे त्या म्हणतात. यावेळी सर्वजन हसू लागतात. कारण देवेंद्रजी, आसाम आणि शिवसेनेशी झालेलं बंड यांचा मोठा संबंध आहे. त्यामुळे अमृता यांची ही मुलाखत भलतीच विशेष असणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अमृता फडणवीस गाणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT