68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Filmfare Awards 2023, Filmfare Awards 2023, Filmfare Awards. Filmfare 2023 SAKAL
मनोरंजन

Filmfare Awards 2023 मध्ये ७ नॉमिनेशन असुनही 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाला एकही पुरस्कार मिळाला नाही

एकही कॅटेगरीत द काश्मीर फाईल्स सिनेमाला पुरस्कार मिळवता आला नाही

Devendra Jadhav

Filmfare Awards 2023 Vivek Agnihotri The Kashmir Files News: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चाहते फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची आतुरतेने वाट पाहत होते. बॉलिवूड इंडस्ट्रीत फिल्मफेयर हा मोठा सोहळा मानला जातो. फिल्मफेअर पुरस्कारांचे यंदाचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 करण्यात आले.

या अवॉर्ड नाईटमध्ये मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकारांचा मेळावा पाहायला मिळाला. 19 मुख्य श्रेणींमध्ये नॉमिनेशनसह तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याच फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्स सिनेमाला ७ नॉमिनेशन्स होती. पण एकही कॅटेगरीत द काश्मीर फाईल्स सिनेमाला पुरस्कार मिळवता आला नाही

(Despite 7 nominations in Filmfare Awards 2023, 'The Kashmir Files' did not win a single award vivek agnihotri)

यामागे मुख्य कारण असं दिसून येतं की.. विवेक अग्निहोत्री यांनी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 बॉयकॉट केले आहेत. "मी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नाही", असं स्पष्टपणे विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन सांगितलं आहे. याशिवाय 'गंगूबाई काठियावाड़ी', 'ब्रह्मास्त्र', 'भूल भुलैया 2', 'बधाई हो 2' , आणि 'ऊंचाई' अशा सिनेमांसोबत बेस्ट सिनेमाच्या रेसमध्ये द काश्मीर फाईल्स होता. याशिवाय आणखी ६ नामांकनं सिनेमाला होती. परंतु फिल्मफेयर सोहळ्याआधी केलेल्या टीकेमुळे विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्स सिनेमाला एकही पुरस्कार मिळालं नाही, अशी चर्चा आहे

काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री?

विवेक म्हणाले होते.. 'मला मीडियाकडून समजलं की, द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळालं आहे. पण मी नम्रपणे सांगतो की, या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्यामध्ये मी सहभागी होणार नाही.'

पुढे ते म्हणाले, 'फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय इतर कोणीही महत्वाचे नाही. लोकप्रिय चेहऱ्यांशिवाय इतर लोकांचं कुणाला काही पडलेलं नाही. म्हणूनच, फिल्मफेअरच्या अनैतिक जगात संजय भन्साळी किंवा सूरज बडजात्या सारख्या मास्टर डायरेक्टर्सना महत्व नाही.'

'संजय भन्साळीची ओळख आलिया भट्ट आहे, तर सूरज यांची ओळख मिस्टर बच्चन आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड्सवरुनच चित्रपट निर्मात्यांची प्रतिष्ठा ठरवली जाते, असे नाही पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे. म्हणून, बॉलिवूडमधील भ्रष्ट, अनैतिक आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात माझा निषेध आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी मी असे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.' अशा पद्धतीने विवेक अग्निहोत्री यांनी सडकून टीका करत फिल्मफेयरला विरोध दर्शवला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT