Jr NTR Devara Movie
Jr NTR Devara Movie 
मनोरंजन

Devara Part One : ज्युनिअर NTR नं नवा लूक व्हायरल करत सांगितली 'देवरा'ची नवी रिलीज डेट!

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Devara Part One : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा चर्चेतला देवरा (Koratala Siva's directorial Devara Part One) नावाचा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातील एनटीआरचा नवा लूक चाहत्यांच्या भेटीला आला असून त्याची नवी रिलीज डेट देखील समोर आली आहे. एनटीआरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन या संबंधी सांगितलं आहे.

एनटीआरच्या पोस्टनुसार हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. एनटीआरनं नवीन पोस्टर शेयर करताना त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ( Koratala Siva's Devara Part One latest news)चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. देवराचा पहिला भाग ऑक्टोबरच्या १० तारखेला येणार आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

देवरा या मुळ तेलुगूमध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान डेब्यू (Saif Ali Khan) करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच्याशिवाय जान्हवी कपूरही (Janhvi Kapoor) या चित्रपटाचा महत्वाचा भाग असल्याची चर्चा आहे. जान्हवी या चित्रपटामध्ये थंगम नावाची भूमिका साकारणार असून सैफ भैरा च्या भूमिकेत दिसणार आहे.

पहिल्यांदा देवराचा पहिला भाग एप्रिलमध्ये येणार असल्याचे सांगण्यात (Devara Part One) आले होते. पाच एप्रिल रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर दिग्दर्शकानं काही तांत्रिक गोष्टींमुळे आणि चित्रपटातील राहिलेल्या त्रुटी भरुन काढण्यासाठी पुरेसा वेळ हवा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटाचा कॅनव्हास आम्ही विचार केला त्यापेक्षा खूपच मोठा असल्याचे दिग्दर्शकानं सांगितले आहे.

देवरा या चित्रपटाच्या निमित्तानं ज्युनिअर एनटीआर (Jr NTR Latest News) आणि कोर्टाला सिवा हे पुन्हा एकाच प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यापूर्वी त्यांनी २०१६ मध्ये आलेल्या जनाथा गार्गे नावाच्या चित्रपटात काम केले होते. एनटीआरचा शेवटचा चित्रपट हा राजामौली यांचा आरआरआर होता. त्यानं ऑस्करपर्यत मजल मारली होती. खरं तर तो वॉर २ मध्ये देखील दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबत मेकर्सकडून अद्याप कोणतेही ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT