मनोरंजन

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांनीही साजरा केला केला रक्षाबंधन...

संतोष भिंगार्डे

मुंबई : बहिण-भावांच्या अतूट नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन.. आज तो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान-सहान मुलांपासूनपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधली. सर्वसामान्यच नव्हे तर कलाकारांनीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

झी युवावरील डॉक्टर डॉन मालिकेतील डॉक्टर डॉन म्हणजेच देवदत्त नागे आणि त्याची डॅशिंग डीन श्वेता शिंदे यांचे रक्षाबंधन खूप छान पार पडले आणि त्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनीही स्वतःच्या अतिशय बिझी वेळापत्रकातून वेळ काढत आपले रक्षाबंधन साजरे केले. देवदत्तला त्याच्या बहिणीने राखी बांधली तर श्वेताने तिच्या भावाला राखी बांधली आहे.

रक्षाबंधन साजरे करण्याबद्दल देवदत्त नागेने सांगितले, की रक्षाबंधन हा एक असा दिवस असतो जेव्हा मी कितीही बिझी असलो तरी माझ्या बहिणीसाठी वेळ काढतोच. आजही पहिले मी रक्षाबंधन केले आणि मगच शूटिंगला निघालो. प्रत्येक भावाने आपल्या बहिणीसाठी एवढा एक दिवस नक्की वेळ काढावा, कारण राखी बांधतानाचा बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाखामोलाचा असतो आणि भाऊ म्हणून आपण तो दिलाच पाहिजे.'
----
संपादन :  ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT