Devendra Fadnavis And Amruta Fadnavis 
मनोरंजन

Devendra Fadnavis: देवेंद्रजींनी लिहिलेलं अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं गाणं ऐकलंत का? सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या या नव्या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गायिका आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं असून या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. सध्या देवेंद्रजी आणि अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

राम नाम (Ram Naam) असं देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचा कोरस उमेश जोशी, विजय धुरी, जनार्दन धात्रक, संतोष बोटे, यश कुलकर्णी, यशद घाणेकर, सौरभ वखारे, विदित पाटणकर, प्रगती जोशी, आरोही म्हात्रे, मृण्मयी दडके, मानसी परांजपे, शमिका भिडे, शरयु राजकुमार दाते, राजकुमार चव्हाण यांनी गायला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

अमृता फडणवीसांनी शेअर केला व्हिडीओ

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर राम नाम या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "अजय-अतुल यांच्या मनमोहक रचनेसह देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भजनाचा एक भाग होताना आनंद झाला."

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

राम नाम या गाण्याला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "खुप छान गाणं लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अपेक्षेप्रमाणे छान संगीत आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, अजय-अतुल सँल्युट तुम्हाला, काय कंपोजिशन आहे."

पाहा व्हिडीओ:

झी म्युझिक कंपनी या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या राम नाम या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्याला आतापर्यंत 83 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT