मनोरंजन

सरु आजींच्या अंधत्वाचं सत्य येणार समोर? डॉ. अजित करणार सिद्ध

काय? सरु आजी खरंच अंध नाही?

शर्वरी जोशी

छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस'devmanus ही मालिका सध्या चांगलीच रंजक वळणावर आली आहे. गावकऱ्यांसमोर आदर्श व्यक्ती म्हणून वावरणाऱ्या डॉ. अजितचं सत्य सर्वांसमोर येऊ लागलं आहे. त्यामुळे या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचत आहे. त्यातच आता अजितकुमार नंतर सरु आजीचंदेखील सत्य समोर येणार आहे. मालिका सुरु झाल्यापासून सरु आजी saru aaji अंध असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र, सरु आजी अंध नसल्याचा दावा अजितकुमार कोर्टात करणार आहे. म्हणूनच, सरु आजी खरंच अंध आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. (devmanus-saru-aaji-is-not-blind-devi-singh-will-prove-that-in-court)

काही दिवसांपूर्वीच एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजित कुमारला फरफटत पोलिस स्टेशनला नेलं होतं. या प्रकरणानंतर अजित चांगलाच संतापला असून सूड भावनेने तो पेटून उठला आहे. त्यामुळे सध्या न्यायालयात अजित स्वत:च त्याची केस लढत असून तो कसा निर्दोष आहे हे चतुराईने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता तो सरु आजीचीदेखील साक्ष घेणार आहे. विशेष म्हणजे ही साक्ष नोंदवत असताना सरु आजीच्या अंधत्वाचं सत्य समोर येणार की काय असं चित्र न्यायालयात उभं राहणार आहे.

सरु आजी अंध नसून तिला सारं काही दिसतं हे अजित न्यायालयात सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे सरु आजी अंध नसल्याचं सिद्ध झालं तर त्यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, ही मालिका सुरु झाल्यापासून सरु आजी खरंच अंध आहे की वेळ नाटक करते हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, आता सरु आजीच्या अंधत्वावरचा पडदा लवकरच दूर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT