Devoleena Bhattacharjee is finalized to play the lead in Dil Diyaan Gallaan post leap Esakal
मनोरंजन

Devoleena Bhattacharjee: गोपी बहू पुन्हा परतणार! या मालिकेतुन देवोलिना करणार एंट्री...

Vaishali Patil

Devoleena Bhattacharjee: 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत 'गोपी बहू'ची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही घराघरात पोहोचली. मालिका संपल्यानंतरही देवोलिना विविध कारणांमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. देवोलिनाने जीम ट्रेनर शहनवाज शेख याच्यासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर सोशल मीडियावर तिला खूप ट्रोलही करण्यात आलं.

मात्र देवोलिना ही गेल्या काही दिवसांपासून टीव्हीपासून दूर होती. त्यांमुळे तिचे चाहते तिला मिस करत होते पण आता लवकरच ती एका नवीन शोसह टीव्हीवर ग्रँड एन्ट्री करणार आहे.

‘दिल दियां गल्लां’ या टीव्ही शोद्वारे ती मोठ्या पडद्यावर परतणार आहे. या मालिकेत दिशा नावाचे नवीन पात्र दाखवणार आहे जे देवोलिना साकारणार आहे.

या शोमध्ये 10 वर्षांचा लीप घोषित झाल्यामुळे यात अनेक नवीन पात्रांची एंट्री होणार आहे. देवोलिना ही दिशा या संगीत शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे. यात ती एका घटस्फोटित आईची भुमिका करेल जिचा भुतकाळ खुपच त्रासदायक आहे. या शोमध्ये ती वीरसोबत असणार आहे. यात 10 वर्षांनंतर अनेक ट्विस्ट अँड टर्न्स असलेली ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

देवोलीनानं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले की, तिला या शोचा भाग बनून खूप आनंद झालाआहे. ‘दिल दियां गल्लां’ या मालिकेबद्दल बोलायचं झाल तर ही मालिका अमृता आणि वीर आणि त्यांची मुलगी आलिया या तिघांची कहानी दाखवते.

मुलगी आलियाच्या जन्मानंतर अमृताचा मृत्यू होतो आणि त्यामुळे वीर आपल्या मुलीपासून दूर राहतो तर एकीकडे आलिया आणि तिचे वडिल वीर तर दुसरीकडे दिशाची कहानी सुरु होणार आहे. आता मालिकेत देवोलीना म्हणेजच दिशाच्या येण्याने आलिया आणि वीर यांच्या आयुष्यात काय बदल होतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत. त्यातच लग्नानंतर देवोलीना या मालिकेतून मोठ्या पडद्यावर परत येणार असल्याने तिचे चाहते देखील आनंदित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT