Devoleena Bhattacharjee and Nia Sharma  
मनोरंजन

आधी भांडण, नंतर जाहीर माफीनामे; अभिनेत्रींची तू तू - मै मै चर्चेत

पर्ल पुरीच्या अटकेवरून निया-देवोलिनामध्ये ट्विटरवर शाब्दिक बाचाबाची

स्वाती वेमूल

अभिनेता पर्ल व्ही. पुरीच्या Peal V Puri case अटकेवरून ट्विटरवर शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर आता टीव्ही अभिनेत्री निया शर्माने Nia Sharma देवोलिना भट्टाचार्जीची Devoleena Bhattarcharjee माफी मागितली आहे. 'माझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांनी मला खूप प्रेमाने समजावलं की मी चुकले होते. या तिघांच्या मताचा आदर करत, देवोलिना मी तुझी माफी मागते. माझा राग अनावर झाला होता. तू मला माफ करशील अशी आशा आहे', असं ट्विट नियाने केलं. या माफीनाम्यानंतर देवोलिनानेही नियाला माफ केलं. अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पर्ल पुरीवरून या दोन अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक बाचाबाची झाली होती. (Devoleena Bhattarcharjee Nia Sharma apologise to each other after Twitter fight over Peal V Puri case)

'माझ्याकडूनही चूक झाल्यास मलाही तू माफ कर. आई, भाऊ आणि रवीला माझ्याकडून धन्यवाद सांग. सुरक्षित राहा आणि काळजी घे', असं उत्तर देवोलिनाने दिलं. 'जिथून सुरुवात झाली, तिथेच हे सर्व संपवतेय. पुन्हा एकदा माफी मागते', असं म्हणत नियाने पुन्हा ट्विट केलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

पर्लची बाजू घेणाऱ्या नियाने ट्विट करत देवोलिनाची खिल्ली उडवली होती. 'दीदीला कोणीतरी जाऊन सांगा की आता धरणा आणि कँडल मार्च करू शकत नाही, कारण कोरोना महामारी आहे. त्याचसोबत दीदीला ते विचित्र डान्स रिल्स बनवण्यापूर्वी डान्सचा सराव करण्याची खूप गरज आहे.' निया शर्माच्या या ट्विटला देवोलिनाने सडेतोड उत्तर दिलं होतं. 'प्लीज छोटीला जाऊन कोणीतरी हे सांगा की फक्त फॅशन स्कील्स दाखवल्याने कोणी चांगला मनुष्य बनत नाही. चांगले विचार आणि चांगलं हृदय असणं गरजेचं असतं, ज्याची कमतरता तिच्यात दिसतेय. मी माझे डान्स रिल्स व्हिडीओ चांगले करते की नाही ते माझ्या चाहत्यांनाच ठरवू दे. इथेसुद्धा परीक्षक होऊन बसली आहे. त्यापेक्षा तू तुझ्या फोटोशूट्सवर लक्ष दे.'

पर्ल पुरीच्या अटकेनंतर नियाने त्याला पाठिंबा देणारं ट्विट करत संबंधित पीडित मुलीवर टीका केली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील एकता कपूर, अनिता हसनंदानी, अली गोनी आणि क्रिस्टल डिसूझा यांसारख्या सेलिब्रिटींनीही पर्लची बाजू घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT