Ram gopal varma and sushant singh Rajput
Ram gopal varma and sushant singh Rajput  esakal
मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरणावर राम गोपाल वर्मांचा मोठा खुलासा, 'कुणालाही...'

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या परखड वक्तव्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्य़ात सापडणारे सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांचे नाव (Bollywood Movies) घेता येईल. ते राजकीय, सामाजिक विषयांवर देखील बिनधास्तपणे प्रतिक्रिया देताना दिसुन आले आहे. आता पुन्हा एकदा ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ती चर्चेत आली आहे. ते म्हणतात, सुशांतची आत्महत्या आणि त्याचा तपास याबाबतील सत्य अद्यापही आपल्यासमोर आलेले नाही. त्यामुळे आपण जे ऐकतो आणि वाचतो आहोत त्याचा आणखी गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. (Bollywood actors) सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर यापूर्वी देखील राम गोपाल वर्मा यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

राम गोपाल वर्मांची दहनम् ( Dhahanam) नावाची मालिका 14 एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. मॅक्स प्लेयरवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे त्याची चर्चा होते आहे. मोठ्या कालावधीनंतर राम गोपाल वर्मा हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगळे वेगळे विषय, चौकटीच्या बाहेरचं दिग्दर्शन, आणि प्रभावी सादरीकरण यामुळे राम गोपाल वर्मा हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. ते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या त्याच्या नव्या मालिकेचं प्रमोशन होतं आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा जुन्या गोष्टींविषयी भाष्य केले आहे. त्यात प्रामुख्यानं अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या प्रकरणाचा त्यांनी उल्लेख केला आहे. अद्याप कुणालाही सुशांत सिंग राजपुत प्रकरणात काय झाले याविषयी माहिती नसल्याचे वर्मा यांचे म्हणणे आहे.

वर्मा यांच्या दहनम् या मालिकेमध्ये विनोद आनंद, ईशा कोप्पीकर, अभिषेक दुहान आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका दक्षिणेकडील राज्यांमध्ये जे नक्षलवादी कार्यरत आहेत त्यांच्यावर आधारित आहे. राम गोपाल वर्मा यांनी या मालिकेची निर्मीती केली असून त्याचे दिग्दर्शन अगस्त्य मंजु यांनी केलं आहे. दहनम् या कथेचे लेखन राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. या मालिकेच्या प्रमोशननिमित्तानं वर्मा यांनी इंडिया टूडेशी खास संवाद साधला त्यावेळी त्यांनी या मालिकेच्या निमित्तानं नक्षलवादी चळवळ आणि सुशांतचा मृत्यु या दोन्ही वेगळ्या पद्धतीनं मांडल्याचे सांगितलं आहे. आंध्रप्रदेशातल्या अंतर्गत भागातील कथा दहनम च्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्यापर्यत सत्य कधी येतच नाही हा धागा पकडून त्यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील काही गोष्टी यावेळी शेयर केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT