Dhanush, Aishwarya Divorce News Dhanush, Aishwarya Divorce News
मनोरंजन

Postponed Divorce : धनुष, ऐश्वर्या विभक्त होणार नाही; घटस्फोटाचा निर्णय पुढे ढकलला?

कुटुंबीयांनी रजनीकांतच्या घरी बसून चर्चा केल्याचे सांगितले जात आहे

सकाळ डिजिटल टीम

Dhanush, Aishwarya Divorce News साउथ स्टार धनुष काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही काळापूर्वी त्याने पत्नी ऐश्वर्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. आता बातम्या येत आहेत की, धनुष आणि ऐश्वर्याला नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि पती धनुष यांनी जानेवारीमध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. ताच्या बातमीनुसार, दोघेही घटस्फोटाची प्रक्रिया थांबवत आहेत. दोघेही आपले वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील. धनुष आणि ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी रजनीकांतच्या घरी बसून चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

जे प्रश्न आहेत ते दोघे मिळून सोडवतील, असे ठरले. वडीलधाऱ्यांचा आदर करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न दोघेही करतील. यावर्षी जानेवारीमध्ये धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते की लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत.

त्यांनी लिहिले होते की, जोडपे म्हणून वेगळे होऊन स्वत:ला एकल व्यक्ती म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. धनुष कामात व्यस्त असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. त्यामुळे धनुष आणि ऐश्वर्यामधील अंतर वाढले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT