dhanush1 
मनोरंजन

'मारी'भाईची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; Avengersच्या टीमबरोबर करणार काम

सकाळन्यूजनेटवर्क

चेन्नई- ‘आडुकलम’, ‘मरियन’, ‘वाडा चेन्नई’, ‘मारी’ असे अनेक सुपरहिट तमिळ चित्रपट करणारा दक्षिणेतील सुपरस्टार धनुष आता हॉलिवूडमध्येही एन्ट्री करत आहे. तो रायन गोस्लिंग आणि क्रिस इव्हान्स या अभिनेत्यांच्या जोडीने ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटात झळकणार आहे. धनुषनेच त्याच्या ट्वीटर हँडलवरून ही माहिती जाहीर केली.

‘नव्या चित्रपटाचा भाग होण्यास उत्सुक आहे,’ असे सांगत धनुषने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. अँथनी आणि ज्यो रुसो या दोघा निर्मात्यांचा ‘द ग्रे मॅन’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. मार्क ग्रिनी यांच्या २००९ मधील ‘द ग्रे मॅन’ या कादंबरीवर तो आधारित आहे. हल्लेखोर (गोस्लिंग) आणि त्याचा माग काढत फिरणारा गुप्तचर विभागाचा अधिकारी (इव्हान्स) यांच्याभोवती ही कथा फिरते. धनुषची चित्रपटातील भूमिका अद्याप गुलदस्तात आहे. धनुषने हिंदीतही ‘रांझना’ आणि ‘शमिताभ’ हे दोन हिंदी चित्रपटही केले आहेत. त्याचा २०१८ मध्ये ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ हा इंग्रजी माध्यमातील चित्रपट आला होता. तो सध्या अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्याबरोबर ‘अतरंगी रे’ या चित्रपटात काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT