Dhanush Sports A Bald Look At Tirupathi; Fans Wonder If This Is His New Look For D50 SAKAL
मनोरंजन

Dhanush Bald Look: तिरुपती बालाजी मंदिरात धनुषने केले केस दान, अभिनेत्याचा नवीन लुक पाहून फॅन्स हैराण

धनुषने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय याशिवाय स्वतःचे केस दान केले आहेत

Devendra Jadhav

Dhanush Bald Look Tirupati Balaji Mandir News: साऊथ सुपरस्टार धनुष चाहच्यांच्या संपर्कात असते. धनुष चाहत्यांच्या भेटीला विविध भुमिकांमधुन येत असते.

अशातच धनुषने एक खास गोष्ट केलीय ज्यामुळे धनुषच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. धनुषने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय याशिवाय स्वतःचे केस दान केले आहेत.

(Dhanush Sports A Bald Look At Tirupathi; Fans Wonder If This Is His New Look For D50)

धनुषसोबत त्यांची दोन्ही मुले यात्रा आणि लिंग हेही सोबत होते. आता त्यावेळचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. फोटोंमध्ये धनुषचं टक्कल झालेलं दिसत आहे.

त्याने मुंडण केले आहे. धनुषने तिरुपती मंदिरात आपले केस दान केल्याची चर्चा आहे. धनुष तिरुपती मंदिरात पोहोचला आणि तिथे पूजा केली. यावेळी दोन्ही मुलांसोबत धनुषचे आई-वडीलही उपस्थित होते.

धनुषचा आगामी सिनेमा

धनुषच्या कॅप्टन मिलर या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा फर्स्ट लूक ३० जून रोजी शेअर करण्यात आला आहे,

ज्यामध्ये अनेक जवानांचे मृतदेह शेतात जमिनीवर पडलेले दिसत आहेत आणि धनुष तिथे उभा असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात धनुष एका सैनिकाच्या भूमिकेत आहे.

याशिवाय धनुषने 'रांझना'चे दिग्दर्शक आनंद एल राय यांच्याशी हातमिळवणी केली आहे. काही काळापूर्वी, निर्मात्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. चित्रपटाचे शीर्षक तेरे इश्क ठेवण्यात आले आहे, ज्यावरून हा एक प्रेमकथेचा चित्रपट असणार आहे.

या घोषणेच्या व्हिडिओने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. धनुषच्या या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता धनुषचा हा नवीन लुक पाहून त्याचा हा लुक D50 या आगामी सिनेमासाठी असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting : सिल्व्हर ओकवर शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची भेट; चर्चांना उधाण, दोन्ही गट एकत्र येणार?

किती रुपयांत बुक करू शकता नवी कोरी Tata Tiago EV फेसलिफ्ट? जाणून घ्या बूकिंगची साधी सोपी प्रोसेस

वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News नागपुरात पोलिसांवर हल्ला, कार अंगावर घालण्याचा प्रयत्न, महिला पोलिसाला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT