Dharmaveer 2 prasad oak in the look of anand dighe at tembhinaka navratri 2023 SAKAL
मनोरंजन

Dharmaveer 2: आणि टेंभीनाक्यावर आनंद दिघे पुन्हा अवतरले, लोकांचा डोळ्यावर विश्वास बसेना, व्हिडीओ व्हायरल

प्रसाद ओक नुकतंच ठाण्यातील टेंभीनाका देवीच्या दर्शनाला दिघे साहेबांच्या लूकमध्ये दिसला

Devendra Jadhav

Prasad Oak at Tembhi Naka: अष्टमीचा दिवस, टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनाला प्रचंड गर्दी. अशातच भर गर्दीत आरमाडा थांबली. आनंद दिघे ज्या आरमाडातून प्रवास करायचे अगदी हुबेहूब तशीच. अशातच भगवी वस्त्रं परिधान केलेले दिघे साहेब जणुकाही अवतरले. सर्व वातावरण एकदम स्तब्ध. शांत.

ही गोष्ट काल रविवारी घडली. जेव्हा आनंद दिघेंची भुमिका साकारणारा प्रसाद ओक टेंभीनाक्यावर दिघे साहेबांच्या लुकमध्ये टेंभीनाक्यावर देवीचं दर्शन घेण्यासाठी आला.

(Dharmaveer 2 prasad oak in the look of anand dighe at tembhinaka navratri 2023)

आणि जणु काही साक्षात दिघे साहेब टेंभीनाक्यावर अवतरले

प्रसाद ओक सध्या धर्मवीर 2 सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. काल अष्टमीच्या दिवशी प्रसाद आनंद दिघेंच्या लुकमध्ये टेंभीनाक्यावर आला. प्रसाद ओक येताच देवीच्या दर्शनाला आलेली माणसं त्याच्याकडे बघतच राहिली.

खुद्द आनंद दिघे साहेब देवीच्या दर्शनाला आले आहेत असा सर्वांना भास झाला. प्रसाद ओकने सुद्धा दिघे साहेबांचा तोच रुबाब, तोच दरारा दाखवत देवीच्या मंडपात प्रवेश केला.

धर्मवीर 2 साठी प्रसाद ओकचं खास शूटींग

टेंभीनाक्यावर दुर्गेश्वरी देवी नवरात्रीत विराजमान असते. नवरात्रीनिमित्त याच ठिकाणी काल धर्मवीर 2 साठी विशेष शुटींग करण्यात आलं. यावेळी प्रसाद ओकने आनंद दिघेंच्या वेशभुषेत देवीची आरती केली. त्याच्यासोबत काही लहान मुलं सुद्धा पाहायला मिळत आहेत.

सिनेमेटोग्राफर महेश लिमये यांनी धर्मवीर 2 साठी हे सर्व क्षण कॅमेरात टिपले. प्रसाद ओक साक्षात आनंद दिघेच वाटत होता.

धर्मवीर 2 ची घोषणा...

दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी यांनी काही दिवसांपुर्वी पोस्टर शेअर करत धर्मवीर 2 ची घोषणा केलीय. "अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार.... सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर 2' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे. "धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." असं कॅप्शन देत धर्मवीर 2 ची घोषणा झाली. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणूक : महायुतीचे खातेवाटप अजूनही गुलदस्त्यात

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

१०० कोटींचा सिनेमा, अभिनयात दिली जिनिलियाला टक्कर, आता 'वेड' फेम अभिनेत्रीला मिळत नाहीये काम, म्हणते- दुसरा पर्याय...

SCROLL FOR NEXT