Dharmendra is proud to see Bobby deol 'Animal'! posted and said  SAKAL
मनोरंजन

Animal Bobby Deol: बॉबीचा 'अ‍ॅनिमल' पाहून वडिलांना अभिमान! धर्मेंद्र पोस्ट करुन म्हणाले...

बॉबीचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा पाहून धर्मेंद्र यांना लेकाचा अभिमान. पोस्ट शेअर करुन मनातल्या भावना केल्या व्यक्त

Devendra Jadhav

Animal Bobby Deol News: 'अ‍ॅनिमल' सिनेमा रिलीज होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. सिनेमाने अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. सिनेमातील सर्वच कलाकारांचं खुप कौतुक होतंय. सिनेमात खलनायक म्हणुन दिसलेला बॉबी देओलला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. बॉबीची 'अ‍ॅनिमल'मध्ये भूमिका छोटी असली तरीही संपूर्ण सिनेमात तो छाप सोडतो.

अशातच बॉबीचा अभिनय पाहून त्याचे वडिल अर्थात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना आनंद झालाय. धर्मेंद्र यांनी मोजक्या शब्दात त्यांच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्यात.

धर्मेंद्र बॉबीबद्दल काय म्हणाले?

धर्मेंद्र कायमच त्यांच्या मुलांचं कौतुक करताना दिसतात. गदर 2 च्या वेळी त्यांनी सनी देओलचं कौतुक केलं होतं. आता 'अ‍ॅनिमल' मधील बॉबीचा अभिनय पाहून धर्मेंद्र यांना वडिल म्हणून लेकाचा अभिमान वाटत आहे.

My , Talented Bob 💕💕💕💕💕💕 अशा मोजक्या शब्दात धर्मेंद्र यांनी लेकाचं कौतुक केलंय. यावरुन धर्मेंद्र बॉबीच्या परफॉर्मन्सने किती खुश झाले आहेत, याचा अंदाज बांधता येतो.

आणि बॉबीला रडू कोसळलं

काल मुंबईत बॉबी देओलने मिडीयाशी संवाद साधला. तेव्हा त्याने सर्वांसमोर हात जोडले. आणि म्हणाला, "सर्वांचे खुप खुप आभार! देव खुप दयाळू आहे. या सिनेमासाठी खुप प्रेम मिळालंय. असं वाटतंय की मी एक स्वप्न बघतोय."

असं म्हणत बॉबी त्याच्या गाडीकडे जायला निघाला. पण त्याला रडू कोसळलं. त्याने गाडीत बसल्यावर पुन्हा एकदा सर्वांने आभार मानुन डोळे पुसले.

अ‍ॅनिमलमध्ये बॉबी देओलने रंगवला खलनायक

'कबीर सिंग'च्या यशानंतर संदीप रेड्डी वंगा यांचा दुसरा बॉलीवूड प्रोजेक्ट अ‍ॅनिमल. सिनेमात रणबीर कपूर मुख्य भुमिकेत आहे. तर रणबीर कपूरला तगडी फाईट दिलीय ते म्हणजे बॉबी देओलने. बॉबी देओलने सिनेमात खुनशी खलनायक साकारलाय. अ‍ॅनिमल मधील बॉबी देओलच्या भूमिकेचं खुप कौतुक होतंय. आता स्वतः वडिलांकडून कामाची पोचपावती मिळाल्याने बॉबीला नक्कीच आनंद झाला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT