Dharmendra News esakal
मनोरंजन

Dharmendra News : धर्मेंद्र यांना झालंय तरी काय? 'अच्छा तो हम चलते है' म्हणत पहाटे तीन वाजता केली पोस्ट!

प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी पुन्हा वेगळी पोस्ट शेयर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Dharmendra News : बॉलीवूडचे हि मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या त्या पोस्टनं पुन्हा एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. पहाटे (Dharmendra Viral News) तीन वाजता धर्मेंद्र यांच्या त्या पोस्टनं चाहत्यांनी धर्मेंद्रजींना विविध प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे.

चाहते चिंतेत..

खरं तर दोन दिवसांपूर्वी देखील धर्मेंद्र यांनी अशाच प्रकारची एक पोस्ट (Bollywood Latest News) केली होती. त्यांनी हातात शिळी चपाती घेत तो व्हिडिओ शेयर केला होता. ते म्हणाले होते की, शिळी चपाती आणि लोणी खाण्याची मजा काही औरच आहे. त्या व्हिडिओवर देखील नेटकऱ्यांनी त्या पोस्टवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता पुन्हा धर्मेंद्र यांनी शेयर केलेल्या त्या पोस्टनं चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाले धर्मेंद्रजी?

सोशल मीडियावर धर्मेंद्र चांगलेच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अच्छा तो हम चलते है...अशी कॅप्शन त्यांनी देत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यावरुन आता वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. यावेळी धर्मेंद्र यांनी त्यांच्या एका चित्रपटाचे पोस्टही शेयर केले आहे.

चाहते काय म्हणाले?

ही मॅन यांची ती पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्यांनी धर्मेंद्र यांच्याप्रती काळजी व्यक्त केली आहे. एकानं म्हटलं आहे की, तुम्हाला आरोग्याच्या काही अडचणी आहेत का, तुम्ही असे का करता, काही झालं तरी आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. दुसऱ्यानं म्हटलं आहे की,एवढ्या पहाटेच तुम्ही पोस्ट केली असे काय झाले की, तुम्ही अशा प्रकारची पोस्ट केली. तुम्हाला आम्ही काहीही होऊ देणार नाही. असे त्या नेटकऱ्यानं म्हटले आहे.

तिसऱ्यानं धर्मेंद्र यांच्याच एका चित्रपटातील गाणं पोस्ट करुन त्यांना कमेंट केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, मैं जट यमला पगला दीवाना...इत्ती सी बात न जाना के...हम सब तेनु बहुत प्यार करते हैं।' अशा प्रकारे नेटकऱ्यांनी धर्मेंद्रप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झाल्यास त्यांनी गेल्या वर्षी करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी नावाच्या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. त्यानंतर ते आता तेरी बातों में ऐसा उलझा जिया नावाच्या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. येत्या काळात ते अपने २ मध्ये दिसणार असून अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT