Dharmendra News 
मनोरंजन

Dharmendra Midnight Photo Viral : 'मला आता झोप येत नाही अन्....', हातात शिळी चपाती घेऊन धर्मेंद्र यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल!

धर्मेंद्र यांच्या व्हायरल झालेल्या त्या (Dharmendra Midnight Photo Viral) व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

युगंधर ताजणे

Dharmendra Midnight Photo Viral: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा सध्य सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ पाहून अनेकांना (Dharmendra News) मोठा धक्का बसला आहे. ८८ वर्षांच्या धर्मेंद्र यांना अशा अवस्थेत पाहून त्यांच्या चाहत्यांचा भडका उडाला आहे. त्यांनी धर्मेंद्र यांना तुम्हाला नेमकं काय झालं, अशी विचारणा केली आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं, व्यक्तिमत्वानं (Dharmendra Viral Video) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या धर्मेंद्र यांच्या नावाची क्रेझ अजुनही बॉलीवूडमध्ये कायम आहे. त्यांच्या नावाभोवती असणारं वलय, त्यांचे देखणेपण हे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलीवूडमध्ये हिमॅन म्हणून लोकप्रिय झालेल्या धर्मेंद्रजींचा आता सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Dharmendra Viral Video

गेल्या वर्षी करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि या वर्षी तेरी बातों में ऐसा उलझा जिया नावाच्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन हा चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना दिलेल्या कमेंट्स देखील भन्नाट होत्या.

सोशल मीडियावर धर्मेंद्र हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ते त्यांच्या लाईफस्टाईलसाठी ओळखले जातात. अशातच त्यांनी एका व्हिडिओमधून आपल्याला रात्री झोप येत नाही. पहाटेच्या चार वाजेपर्यत जागे राहावे लागते. मित्रांनो मला शिळी चपाती ही लोण्यासोबत खावी लागते. पण तुम्हाला सांगतो त्याची चव काय भारी असते म्हणून सांगू...

धर्मेंद्र यांच्या त्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी एकीकडे त्यांचे कौतुक तर दुसरीकडे त्यांच्याप्रती काळजी व्यक्त केली आहे. तुम्ही शिळी चपाती का खाता, तुम्हाला काही झाले आहे का, तुमची प्रकृती कशी आहे अशा प्रकारचे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारुन धर्मेंद्र यांच्याप्रती काळजी व्यक्त केली आहे.

धर्मेंद्र यांचा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना विचारले आहे की, तुमच्या पायाला काही दुखापत झाली आहे का, त्यावर त्यांना धर्मेंद्र यांना विचारले आहे की, माझ्या पायाला फ्रॅक्चर झाले असून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी सुखरुप असल्याचे म्हटले आहे.

धर्मेंद्र हे ८८ वर्षांचे असून ते मुंबईपासून दूर त्यांच्या एका फार्म हाऊसमध्ये राहतात. त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ते येत्या काळात अपने २ आणि इक्कीसमध्ये दिसणार आहेत. इक्कीसमध्ये ते अमिताभ बच्चन सोबत स्क्रिन शेयर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT