dia mirza 
मनोरंजन

नवविवाहित दियाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज; पाहा फोटो

सकाळ ऑनलाइन

अभिनेत्री दिया मिर्झा आजही 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखली जाते. या चित्रपटानंतर दियाच्या सौंदर्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. काही दिवसांपूर्वीच दिया तिच्या दुसऱ्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. दियाने व्यावसायिक वैभव रेखीशी दुसरं लग्न केलं. मुंबईत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे आणि मित्रमंडळी उपस्थित होते. लग्नानंतर दिया आणि वैभव मालदिव याठिकाणी फिरायला गेले आहेत. तिथलेच काही फोटो दियाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

दियाच्या फोटोंची चर्चा
विविध फोटो आणि पोस्टद्वारे दिया नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मालदिवच्या निळ्याशार समुद्रकिनारी वैभवने दियाचे हे फोटो काढले आहेत. यामध्ये दियाने बिकिनी टॉप आणि श्रग परिधान केल्याचं दिसून येत आहे. दियाचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे. 'जणू स्वर्गच', असं कॅप्शनमध्ये लिहित दियाने सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटत असल्याचं सांगितलं. 

दियाने १५ फेब्रुवारी रोजी वैभव रेखीसोबत दुसरं लग्न केलं. वैभवचंही हे दुसरं लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. दियाचा लग्नसोहळा एका महिला पंडिताने पार पाडला होता. त्याचेही फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. याआधी दियाने साहिल संघाशी लग्न केलं होतं. २०१९ मध्ये तिने साहिलला घटस्फोट दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT