Amitabh Bachchan Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची बातमी खोटी? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आता अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची बातमी खोटी होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

priyanka kulkarni

Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे, अशी बातमी काल (15 मार्च) सोशल मीडियावर व्हायरल झाली. शुक्रवारी बिग बींना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असंही म्हटलं गेलं. अशातच आता अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आता अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची बातमी खोटी होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बिग बींचा व्हिडीओ व्हायरल

अमिताभ बच्चन यांचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक रिपोर्टर अमिताभ बच्चन यांना प्रश्न तुमची तब्येत कशी आहे, यावर अमिताभ बच्चन म्हणतात, 'ठिक आहे', त्यानंतर बिग बी म्हणतात, 'फेक न्यूज' आता अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची बातमी खोटी होती का?

पाहा व्हिडीओ:

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फोटो

काल ISPL च्या फायनल मॅचला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली. या मॅचमधील काही फोटो बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत सचिन तेंडूलकर आणि अभिषेक बच्चन हे देखील दिसत आहेत. या फोटोला अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिलं, "महान सचिनकडे क्रिकेटच्या खेळाविषयी असलेले अफाट ज्ञान पाहून अवाक् झालो. ISPL च्या संध्याकाळच्या फायनलमध्ये इतका आम्ही एकत्र वेळ घालवला."

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन हे प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बिग बींचा 'गणपत' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अमिताभ बच्चन यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटात देखील काम केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळल घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Education: दिशाभूल करणाऱ्या शाळांना बसणार चाप; शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली, नेमके कसे आहेत बदल?

Satara Rain: सातारा जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग; वीजपुरवठा खंडित; पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर, अनेक रस्ते बंद!

शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी! शाळा देईनात रिक्त-अतिरिक्त पदांची माहिती; दुसऱ्यांदा काढावा लागला आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला इशारा, वाचा...

शाळांचे धाबे दणाणले! परीक्षा सुरु असताना एकाचवेळी होणार सर्व शाळांमधील पटपडताळणी; शिक्षण संचालकांचे आदेश; पटसंख्येतील शाळांची बनवेगिरी उघड होणार

SCROLL FOR NEXT