Did Anil Kapoor just reveal birthday girl Sonam Kapoor is expecting a baby boy ? instagram
मनोरंजन

सोनम कपूरला मुलगा होणार की मुलगी?; अनिल कपूर यांनी बोलता-बोलता सांगून टाकलं

सोनम कपूर सध्या लंडनमध्ये आपल्या पतीसोबत राहत आहे. अनिल कपूर यांनी तिच्या वाढदिवसानिमित्त केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

अभिनेता अनिल कपूर(Anil Kapoor) सध्या त्यांच्या 'जुग जुग जियो' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतेच बिझी आहेत. 'जुग,जुग जियो' मध्ये वरुण धवन,नीतू कपूर आणि कियारा अडवाणी सोबत सिनेमात धम्माल करताना अनिल कपूर दिसणार आहेत. या दरम्यान अनिल कपूर यांनी मुलगी सोनम कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा(Birthday Wish) देताना स्पेशल पोस्ट(Post) केली आहे. ज्यामध्ये होणाऱ्या नातू किंवा नातीविषयी(Grand Child) त्यांनी उत्सुकता दाखवली आहे. सोनम कपूर(Sonam Kapoor) सध्या प्रेग्नेंट आहे. आणि लवकरच ती आयुष्याच्या एका नवीन गोड प्रवासाला सुरुवात करणार आहे,ती लवकरच आई होणार आहे.(Did Anil Kapoor just reveal birthday girl Sonam Kapoor is expecting a baby boy?)

अनिल कपूर यंदा सोनम कपूरचा वाढदिवस तिच्यासोबत साजरा करू शकले नाहीत. कारण सध्या सोनम आपला पती आनंद आहूजा सोबत लंडन मध्ये आहे. यामुळे सोशल मीडियावर अनिल कपूर यांनी मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रेमाचा वर्षाव केला आहे. याच पोस्टमध्ये बोलता-बोलता अनिल कपूर यांनी सोनमच्या होणाऱ्या बाळाबद्दलही भाष्य केलं आहे.

अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे,'' या वर्षी मुलीसोबत मी वाढदिवस साजरा करू शकलो नाही पण आशा आहे पुढच्या वर्षी तिच्या होणाऱ्या बाळासोबत मी माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करेन. पुढच्या वर्षी आमचं नातवंडं आमच्या कुशीत असेल.(त्यांनी म्हटलं आहे, आईवडीलांसाठी त्यांची मुलं खुश असतील यातच सगळं आलं. ते दुखी तर आईवडिलही दुखी. हॅप्पी बर्थडे माझ्या प्रिय मुली. आम्ही खुप आतुरतेने वाट पाहत आहोत,माझी मुलगी,जावई आनंद आणि आमच्या घरात येणाऱ्या प्रिन्सची अर्थात राजकुमाराची..''.अनिल कपूर यांच्या या पोस्टमुळे सोनमला लवकरच पुत्ररत्नाचा लाभ होणार हे कळलं आहे. अनिल कपूर यांची ती पोस्ट बातमीत जोडलेली आहे. सोनमला मुलगा होणार याविषयीची ती पोस्ट नक्की वाचा.

अनिल कपूर यांचा 'जुग जुग जियो' सिनेमा २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन 'गूड न्यूज' सिनेमाचा दिग्दर्शक राज मेहता यांनी केलं आहे. हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा आहे. तर सोनम कपूर आपल्याला लवकरच आगामी 'ब्लाइंड' सिनेमात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT