Salman Khan,Ram Gopal Verma Google
मनोरंजन

सलमानला झालेल्या सर्पदंशाचं त्याच्या हिट अॅन्ड रन केसशी कनेक्शन;कसं?

राम गोपाल वर्मानी सोशल मीडियावर थेट पोस्टर पोस्ट करून उडवली खिल्ली...

प्रणाली मोरे

सलमान खान(Salman Khan) हे नाव बॉलीवूडमधलं मोठं नाव पण राम गोपाल वर्मा(Ram Gopal Verma) या नावाभोवतीही प्रसिद्दिचं वलय आहे हे नाकारून चालणार नाही. दोघेही गेली अनेक वर्ष अभिनेता-दिग्दर्शक असे लेबल मिरवत इंडस्ट्रीत काम करतायत. पण सलमान अजूनही तेजीत आहे तर राम गोपाल वर्मा हा मधनं कधीतरी कुठल्याशा बाईसोबत डान्स वगैरे केल्यामुळेच चर्चेत आलाय. आता सलमानचा बॉलीवूड मधला दबदबा हा किती मोठा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानं मनात आणलं तर तो काय करू शकतो हे वेगळं सांगायला नकोच. विवेक ओबोरॉय,जॉन अब्राहम,अरजित सिंग अशा बड्या नावांचं टॅलेंट असूनही काम कसं कमी झालं हे जिवंत उदाहरण आहेच आपल्या सर्वांच्या डोळयासमोर. तरीदेखील राम गोपाल वर्माने उघड उघड वाघाच्या जबड्यात हात घातलाय म्हणजे डेरिंगच म्हणायची. पुढे सविस्तर वाचा.

किस्सा मजेदार असला तरी पुढे कसं वळण घेईल हे माहीत नाही,आता सलमान भाईच्या मूडवर सगळं ठरलेलं. तर सलमान काही दिवसांपूर्वी आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर कुटुंबासोबत सेलिब्रेशनसाठी गेला होता. तिथं त्याला साप चावला,पण तो विषारी नसल्यानं सलमानला काही तासांसाठीच उपचारासाठी इस्पितळात ठेवले होते. त्यानंतर परतल्यावर त्यानं छान वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आणि काही दिवस तिथे त्याने एन्जॉयही केलं. ही बातमी वा-यासारखी पसरल्यावर सर्व स्तरातून त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली गेली. रविना टंडनने एक फनी पोस्ट केली होती की,'साप मेला का?' ती पोस्ट फनी म्हणून चर्चेत होती. पण आता आणखी एक पोस्ट गाजणार आहे पण त्यामुळे पोस्ट करणा-या राम गोपाल वर्मांचे सलमान काय करेल हे सांगता येत नाही. राम गोपाल वर्मा यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आम्ही पुढे जोडलेली आहे.

Ram Gopal Verma's post for salman

तर २७ सप्टेंबर २००२ मध्ये सलमान खानने त्याच्या लॅंड क्रुझर या गाडीनं बांद्रे येथील एका बेकरीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या काही गरिबांना चिरडलं होतं. ज्यात एकाचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. सलमाननं दारू पिऊन गाडी चालवल्यानं अपघात झाल्याचं समोर आलं,ज्यात सलमान दोषी सापडलाही अनं त्याला मे,२०१५ मध्ये पाच वर्षांची शिक्षा ट्रायल कोर्टात ठोठावण्यात आली पण सलमाननं डिसेंबर २०१५ मध्ये मुंबई हाय कोर्टात अपिल केलं आणि सांगितलं की,'' माझा ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता''. त्यामुळे सलमान या केसमधनं आपसूक सुटला. आता सत्य बोलायचं नाही पण सगळ्यांनाच माहितीय नेमक काय घडलं असेल ते. असो,ही केस तेव्हा बंद झाली,सलमान निर्दोष सुटला पण राम गोपाल वर्मांच्या धुर्त डोक्यानं आज पुन्हा सहा वर्षांनी त्याच्या त्या केसचा संबंधँ एका पोस्ट द्वारे त्याला चावलेल्या सापाशी लावलाय. त्या पोस्टमध्ये म्हटलंय,''सलमानला चावलेल्या सापाला पकडल्यावर तो कोर्टात उभा राहून म्हणेल मी नाही चावलो,माझा ड्रायव्हर चावला''. आता काय म्हणायचं राव राम गोपाल वर्मांच्या धुरंदरपणाला. सॉल्लिड,पण आता सलमान पुढे टिका म्हणजे झालं. नाहीतर गायब व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT