lagaan 
मनोरंजन

20 Years of Lagaan: आमिरने दोन वेळा दिला होता नकार

कथेला म्हटलं होतं विचित्र

स्वाती वेमूल

बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि अभिनेता आमिर खानला Aamir Khan एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवणारा 'लगान' Lagaan हा चित्रपट २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यातील काही दृश्यांवरून आजही सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होतात. आशुतोष गोवारीकर Ashutosh Gowariker यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. पण तुम्हाला माहितीये का, अनेक पुरस्कार पटकावलेल्या या चित्रपटाला आमिरने आधी दोन वेळा नकार दिला होता. एका मुलाखतीत खुद्द आमिरने याचा खुलासा केला होता.

गोवारीकर यांनी आमिरला स्क्रिप्ट दाखवली. मात्र त्याला कथा खूप विचित्र वाटल्याने त्याने ती नाकारली. याविषयी आमिर म्हणाला होता, "चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर पाचव्या मिनिटाला मी ती नाकारली होती. कारण मला कथानक खूप विचित्र वाटलं होतं. असं कुठेही घडणं शक्य नाही म्हणत मी त्यांना नकार दिला होता."

जवळपास महिनाभरानंतर गोवारीकर यांनी कथा पूर्ण करून पुन्हा एकदा आमिरला चित्रपटाची स्क्रिप्ट दाखवली होती. त्यावेळी आमिरला चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली. 'लगान'ची पूर्ण कथा ऐकल्यानंतर आमिरने गोवारीकरांना होकार कळवला. २००१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ऑस्कर अवॉर्डसाठी त्याला नामांकनसुद्धा मिळालं होतं. या चित्रपटात आमिरने 'भुवन' नावाची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT