digpal lanjekar subhedar movie poster launch in pune at tron animation college SAKAL
मनोरंजन

Subhedar Movie: पुण्याच्या ट्रॉन अ‍ॅनिमेशन महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात 'सुभेदार'चं भव्यदिव्य पोस्टर लॉंच

सुभेदार सिनेमाच्या प्रमोशनला पुण्यात सुरुवात झालीय

Devendra Jadhav

Subhedar Movie Poster Launch News: सध्या बाईपण भारी देवा सिनेमानंतर अनेक मराठी सिनेमे आगामी काळात भेटीला येणार. यातलाच एक महत्वाचा सिनेमा म्हणजे सुभेदार. दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टक मधला पाचवा सिनेमा म्हणजे सुभेदार.

सुभेदार सिनेमाची घोषणा काही महिन्यांपुर्वी झाली. सुभेदार सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुभेदार सिनेमाचं पुण्यात भव्य पोस्टर लॉंच करण्यात आलंय.

(digpal lanjekar subhedar movie poster launch in pune)

पुण्याच्या ट्रॉन अ‍ॅनिमेशन महाविद्यालयात पोस्टर लॉंच

सुभेदार सिनेमाची टीम पुण्याला गेली होती. ट्रॉन अ‍ॅनिमेशन महाविद्यालयात सुभेदार सिनेमाची टीम उपस्थित होती.

यावेळी सुभेदारचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रमुख भुमिका साकारणारा अभिनेता अजय पुरकर याशिवाय जिजाऊ साहेबांची भुमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित होती.

सुभेदार सिनेमाची टीम कॉलेजच्या वरच्या मजल्यावर उभी होती. पुढे मग ढोल ताशांच्या गजरात सिनेमाच्या टीमने पोस्टर लॉंच केलं.

सुभेदार सिनेमाचं नवीन पोस्टर

काही दिवसांपुर्वी सुभेदार सिनेमाचं नवीन पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आलंय. या पोस्टरमध्ये दिसतं की शिवाजी महाराजांच्या चरणांशी तान्हाजी मालुसरे बसले आहेत.

शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांसमोर तान्हाजींनी कोंढाणा मिळवण्याचा विडा उचललेला दिसतोय. जिजाऊ साहेबांच्या चेहऱ्यावर कौतुक तर शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत आहेत.

कोंढाणा आणिन स्वराज्यात, लावतो प्राणांची बाजी,शब्द असे मातोश्री अन राजं, सांगती सुभेदार तान्हाजी, असं कॅप्शन देत अंगावर काटा आणणारं हे रोमांचकारी पोस्टर आज रिलीज झालंय

सुभेदार सिनेमाची रिलीज डेट बदलली

सुभेदार सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झाल्यावर सिनेमाविषयी मोठी अपडेट समोर आलीय. सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.

सुभेदार सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार होता. पण आता मात्र सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. सिनेमा आता एक आठवडा आधी म्हणजे १८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaidyanath Karkhana: गोपीनाथ गडाचा परिसर असलेल्या जमिनीचीही विक्री; 'वैद्यनाथ'कडे असलेली बाकी कोण देणार? पंकजा मुंडेंचं अजूनही मौनच

चिमुकल्यांसाठी धमाल घडवणारं नाटक रंगभूमीवर; 'माकडचाळे' बालनाट्याचा दिवाळीत होणार शुभारंभ; माकडाच्या भूमिकेत कोण दिसणार?

Pregnancy Nutrition Tips: ए. जी. ई म्हणजे नेमकं काय? गरोदरपणावर त्याचा काय परिणाम होतो? वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

Satana Election News : 'मतदार यादीतील दुबार नावे हा लोकशाहीचा खून'; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune Police : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून १८ सराईत गुन्हेगार तडीपार

SCROLL FOR NEXT