dil dimag aur batti
dil dimag aur batti  sakal
मनोरंजन

'दिल दिमाग और बत्ती' चं पोस्टर भलतंच गाजतंय, काय आहे हा चित्रपट?

नीलेश अडसूळ

हल्ली व्हिएफएक्स आणि अनुधिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात एखाद्या सत्तर ऐंशी दशकातील चित्रपट वाटावा असं एक पोस्टर काही दिवसांपूर्वी सामोरं आलं.या पोस्टरचा वेगळेपणा उठावदार असल्याने हा चित्रपटही असाच काहीसा असेल अशी चर्चा सुरु झाली. आणि नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्याने रसिकांना अक्षरशः हा चित्रपट कधी पाहतोय असे झाले आहे.

या चित्रपटाच्या पोस्टर प्रमाणेच कथाही काहीशी जुन्या धाटणीची आहे. कारण हा चित्रपट एका चित्रपट निर्मित्यावर बेतला आहे. जत्रेत हरवलेले तीन भाऊ, भूकंप किंवा तत्सम संकटात वेगळे झालेले त्यांचे आई-वडील आणि मग या तीन मुलांच्या नायिका, त्यांच्या प्रेमकथा, या तिन्ही भावांना एकत्र आणणारे योगायोग आणि मग सरतेशेवटी या सगळय़ा जत्रेतील माणसांना एकत्र आणणारा समाप्त. असे अनेक चित्रपट सत्तर-ऐंशीच्या दशकात निर्माते- दिग्दर्शक मनमोहन देसाईंनी केले आणि प्रेक्षकांना ते आवडलेही. अशाच धाटणीचा निखळ आणि भरगोस मनोरंजन करणारा 'दिल दिमाग और बत्ती' हा चित्रपट आहे. (dil dimag aur batti)

या चित्रपटात अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी मोहन देसाई (mohan desai )नामक व्यक्तिरेखा साकारली आहे. तर वंदना गुप्ते यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या दोघांचेही लुक त्यांत भन्नाट असून आपल्याला ऐंशीच्या दशकाची प्रकर्षाने आठवण करून देतात. चित्रपटात दिल, दिमाग असे दोघे भाऊ आणि बत्ती नावाची त्यांची बहीण यांची ही कथा आहे. या चित्रपटाचं वैशिष्टय़ म्हणजे किशोर, आनंद कुलकर्णी, वैभव मांगले, सोनाली कुलकर्णी, पुष्कर ते अगदी संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज, सागर संत अशा नव्या-जुन्या कलाकारांनी एकत्र येऊन काम केलं आहे. विशेष म्हणजे वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात एकत्र डान्सही केला आहे. (vandana gupte) (dilip prabhavalkar)

या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते (rushikesh gupte) यांनी केले आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून निर्माते मनमोहन देसाई आणि त्यांच्या चित्रपटांना मानवंदना देण्यात आली आहे. ‘हा चित्रपट एक वेगळाच अनुभव आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपटांचा फिल्मी फॉम्र्युला या चित्रपटात पाहायला मिळतो; पण म्हणजे फक्त त्या पद्धतीचे कथानक यात दाखवण्यात आलेले नाही. अतिशय रंजक आणि अ‍ॅक्शनने भरपूर असा चित्रपट आहे,’ असा या चित्रपटाविषयी दिलीप प्रभावळकर यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली.

आम्ही धर्मेद्र-हेमामालिनी..

दिलीप प्रवाळकर म्हणतात, 'वंदना आणि मी खूप चित्रपट- नाटकांमधून एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही दोघंही गमतीने म्हणतो की, आमची जोडी ही धर्मेद्र आणि हेमामालिनीसारखी आहे. फक्त आमच्यात धर्मेद्र कोण आणि हेमामालिनी कोण हे आम्ही त्या त्या वेळेनुसार ठरवतो. जयवंत दळवींचं ‘संध्याछाया’ हे नाटक जेव्हा पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर आलं तेव्हा त्या नाटकात आम्ही दोघांनी काम केलं होतं. ‘नांदा सौख्य भरे’ नावाचं नाटक केलं होतं, तेव्हापासून ते अगदी अलीकडे ‘फॅमिली कट्टा’, ‘मर्डर मिस्ट्री’, ‘होऊन जाऊ द्या’ अशा किती तरी चित्रपटांतून मी आणि वंदनाने एकत्र काम केलेलं आहे.

ही भूमिका तरुण वयात मिळायला हवी हवी
वंदना गुप्ते म्हणतात, ' ‘मला पडद्यावर नाचायला – बागडायला नेहमीच आवडतं, पण खरोखरच तशा पद्धतीची भूमिका पडद्यावर मी पहिल्यांदाच केली आहे आणि या वयात अशी भूमिका मिळाली म्हणजे आनंदच. अशी भूमिका तरुण असतानाच्या काळात मिळाली असती तर मी काय काय केलं असतं असं वाटायला लावणारी ही भूमिका आहे. खरं तर या चित्रपटाची कथा हृषीकेश गुप्ते यांनी ऐकवली तेव्हा हृषीकेशसारख्या लेखकाला या अशा फिल्मी सिनेमाचं स्वप्न कसं काय पडू शकतं, असं मला वाटलं. कल्पना भन्नाट असली तरी हे प्रत्यक्षात साकारता येईल, याबद्दल मी साशंकच होते; पण प्रत्यक्षात पडद्यावर हा चित्रपट पाहताना मला स्वत:ला खूप मजा आली.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT