dilip kumar atal bihari vajpayee 
मनोरंजन

कारगिल युद्धात वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत

सकाळ वृत्तसेवा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासंबंधी एक रंजक किस्सा आपण जाणून घेऊयात.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासंबंधी एक रंजक किस्सा आपण जाणून घेऊयात. कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतली होती. युद्ध सुरु झाल्यावर वाजपेयींनी दिलीपकुमार आणि नवाझ शरीफ यांच्यात दुरध्वनीद्वारे चर्चा घडवली होती. यात दिलीपकुमार यांनी पाकिस्तानने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन शरीफ यांना केले होते.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांनी एक पुस्तक लिहीले असून या पुस्तकात कारगिल युद्धातील एका प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे. कारगिल युद्ध सुरु झाल्यावर अटलबिहारी वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला. लाहोर दौ-यावर असताना शरीफ यांनी योग्य सन्मान दिला नाही अशी तक्रार वाजपेयींनी केली होती. एकीकडे लाहोरमध्ये वाजपेयींचे जल्लोषात स्वागत होत असताना दुसरीकड़े पाक सैन्य भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते असे वाजपेयींनी शरीफ यांना सांगितले.

यानंतर शरीफ यांनी या प्रकाराची आपल्याला काहीच माहिती नाही, लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा करुन तुमच्याशी पुन्हा चर्चा करतो असे शरीफ यांनी वाजपेयींना सांगितले. यानंतर वाजपेंयींनी एका व्यक्तीला तुमच्याशी बोलायचे आहे असे शरीफ यांना सांगितले. ही व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार होती.दिलीप कुमार यांनी शरीफ यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. भारत - पाकमधील संबंधामुळे भारतातील मुसलमान भयग्रस्त झाले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडायलाही भीती वाटते. त्यामुळे तुम्हीच आता पुढाकार घ्यावा असे आवाहन दिलीप कुमार यांनी केले.

'तुम्ही भारत - पाकमधील शांतीपूर्ण संबंधांचे समर्थक आहात पण तुमच्याकडून आम्हाला अशी आशा नाही' असेही दिलीपकुमार यांनी शरीफ यांना सुनावले होते. पाकिस्तानने यापूर्वी दिलीप कुमार यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानितही केले होते. दिलीप कुमार यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यांच्या जाण्याने जगभरातील त्यांचा चाहत्यांना धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bopdev Ghat Accident Breaking : पुण्यातील बोपदेव घाटात भीषण अपघात! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला; २ जणांचा मृत्यू तर ३ गंभीर

ICC Test Rankings: बुमराहने मारली मोठी लांब उडी, नंबर-१ च्या दिशेने वाटचाल; यशस्वी जयस्वालची टॉप-१० मध्ये धडक

Mandar Kivale case : पुण्यात कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबार अन् कोयत्याने हल्ला, जुना वाद समोर

गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, ४ संचालकांना कोल्हापूर सर्किट बेंचने दिले ‘हे’ आदेश

Latest Marathi News Live Update: हार्वेस्टर चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

SCROLL FOR NEXT