Dilip Prabhavalkar Google
मनोरंजन

'बोक्या सातबंडे' परत येतोय!

ज्येष्ठ अभिनैते दिलीप प्रभावळकरही महत्त्वाच्या भूमिकेत

प्रणाली मोरे

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची लेखणी जितकी खुसखुशीत तितकाच त्यांचा अभिनय चटकदार. केवळ मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. भूमिका गंभीर असो की विनोदी दिलीप प्रभावळकर नावाचा परिसस्पर्श त्याला झाला की त्या भूमिकेचं सोनं झालंच म्हणायचं. त्यांनी साकारलेल्या 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस'मधील गांधीजींच्या भूमिकेनं लोकांना गांधीजींच्या अधिक जवळ नेलं. त्यांनी लिहिलेलं साहित्यही असंच काहीसं. त्यातनं त्यांनी उभं केलेलं कोणतंही पात्र आपल्या घरातलं होऊन जायचं. 'बोक्या सातबंडे'ही त्यापैकीच एक.

अमरत्वासोबतच लोकप्रियतेचा वरदान घेऊन जन्माला आलेल्या 'बोक्या सातबंडे' अर्थात अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या मानस पुत्राचा ख्याती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुस्तक,मालिका,चित्रपट,बालनाटय अशा सर्वच माध्यमातून प्रवास करणा-या बोक्या सातबंडे चा नवा प्रवास स्टोरीटेल मराठी वर सुरू होतोय. दस्तुरखुद्द दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात प्रत्येक रविवारी 'संडे विथ बोक्या सातबंडे' द्वारे दहा भागाच्या ऑडिओबुक मालिकेतून बालदोस्तांचे मनोरंजन करणार आहे. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार पटकावणा-या आपल्या लाडक्या 'बोक्या सातबंडे' चे हे सारे पराक्रम त्यांना 'स्टोरीटेल' मराठीवर ऐकता येणार आहे.

Bokya Satbande

बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खटयाळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसा? ते या गोष्टीतून कळेलच. पण याचं खरं नाव बोक्या सातंबडे नाही! मग त्याचं खरं नाव काय आहे? त्याला बोक्या सातबंडे हे नाव कसं पडलं आणि त्याच्या खोड्या हे सगळं एन्जॉय करत त्यांची जन्मकहाणी ऐकाला मिळेल ते थेट या कलाकृतीचे जन्मदाते लेखक-अभिनेते दिलिप प्रभावळकर यांच्याकडून .

प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांना अभिनयाच्या व साहीत्याच्याही क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार,साहित्य अकादमी पुरस्कार,राष्ट्रीय पारितोषिक,पु.ल. बहुरूपी सन्मान,विष्णुदास भावे गौरव पुरस्कार,बालगंधर्व पुरस्कार,चिंतामणराव कोल्हटकर स्मृती पुरस्कार,महाराष्ट्र राज्य पुरस्कार व नाट्यदर्पण मानचिन्हे इत्यादी पुरस्कार,सन्मानांनी गौरविण्यात आलंय. आजही नवनव्या भूमिका साकारण्यापूर्वी दिलीप प्रभावळकर तितक्याच जोमाने त्या साकारताना व त्यातील नवनवीन बारकावे तितक्याच उत्साहाने शोधताना आढळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT