dino james wins khatron ke khiladi 13 know prize money Fanal Stunt marathi news  
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 13 Winner : डिनो जेम्स ठरला 'खतरों के खिलाडी 13' चा विजेता, ट्रॉफीसह मिळाले 'इतके' लाख

'खतरों के खिलाडी 13' च्या या सीझनला आज नवा विजेता मिळाला आहे

रोहित कणसे

'खतरों के खिलाडी 13' च्या या सीझनला आज नवा विजेता मिळाला आहे. डिनो जेम्स याने हा या रिअॅलिटी शोच्या या सीझनचा विजेता ठरला आहे. ग्रँड फिनालेचा शेवटचा स्टंट पूर्ण करत त्याने ही ट्रॉफी जिंकली. हा शो जिंकल्याबद्दल डिनोला 20 लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. याशिवाय मारुती स्विफ्ट कारही देण्यात आली. या शोमध्ये त्याच्यासह अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा टॉप 3 मध्ये होते.

या रिअॅलिटी शोमध्ये तब्बल 13 आठवडे वेगवेगळे धोकादायक स्टंट्स पूर्ण केल्यानंतर अखेर 13व्या सीझनचा विजेता समोर आला आहे. अंतिम फेरीत ऐश्वर्या शर्मा, दिनो जेम्स, अरिजित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे यांच्यात ट्रॉफीसाठी लढत होती. मात्र सोशल मीडियाववर डिनो जेम्सलाच ट्रॉफी मिळेल असा विश्वास नेटकऱ्यांना होता.

ग्रँड फिनालेचा स्टंट काय होता?

शेवटच्या स्टंटसाठी सर्वप्रथम स्पर्धकांना दोरीच्या साहाय्याने हेलिकॉप्टरवर चढावे लागले. तिथे जाळ्यात एक चावी अडकवण्यात आली होती, ती घेऊन स्पर्धकांना पाण्यात उडी मारायची होती. त्यानंतर एक गोल बोट होती तिथंपर्यंत स्पर्धकांना पोहून पोहचायचे होते. या बोटीत पोहचल्यावर तेथे डायनामाइटचा एक तुकडा ठेवण्यात आला होता. तो उचलून हात हलवायचा होता.

त्यानंतर दुसरी बोट येणार ज्याच्या मागे दोरीने बांधलेल्या जाळीवर स्पर्धकांना जायचे होते आणि त्यानंतर ही बोट पाण्यात वेगाने पुढे जात असताना स्पर्धकांना त्यावर ठेवलेली एक चावी मिळवायची होती. ती चावी घेऊन एका कंटेनरवर चढायाचे होते. तिथून डायनामाइट घेऊन पाण्यात उडी मारायची होती.

मग स्पर्धकाला पाण्यातून बाहेर पडून एका कंटेनरवर चढायचे होते. तेथे लावलेले कुलूप उघडून आत जाऊन डायनामाइटचा प्रत्येक भाग जोडायचा होता. हे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बटण दाबून टास्क पूर्ण करायचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT