director Ali Akbar  
मनोरंजन

दिग्दर्शकाकडून इस्लाम धर्माचा त्याग; बिपीन रावतांच्या निधनावर स्माइली पोस्टमुळे व्यथित

पत्नीसह हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं जाहीर केलं.

स्वाती वेमूल

मल्याळम दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी इस्लाम धर्माचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं. तमिळनाडूमधील कुन्नूर इथं लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुस्लीम समाजातील काहींनी स्माइली इमोजी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. या कृत्याच्या निषेधार्थ अली अकबर आणि त्यांनी पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं जाहीर केलं.

मुस्लीम नेत्यांवर व्यक्त केली नाराजी

मुस्लीम धर्मातील वरिष्ठ नेत्यांनीही अशा कृत्याचा निषेध नोंदवला नाही. भारतीय संरक्षण दलाच्या शौर्यवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निधनासंदर्भातील अशा प्रतिक्रिया स्वीकारल्या जाऊ शक नाही, असं अली अकबर म्हणाले. त्यांनी यांसंबंधि फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला. "मला जन्मापासून मिळालेली ओळख मी फेकून देतोय. आजपासून मी मुस्लीम नाही तर भारतीय आहे. भारताविरोधात स्माइली पोस्ट करणाऱ्या हजारो लोकांविरोधात ही माझी प्रतिक्रिया आहे", असं ते म्हणाले.

अली अकबर यांच्या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी त्यांचं समर्थन केलं तर काहींनी त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या. धर्मांतर करण्याच्या शासकीय प्रक्रिया पूर्ण करून पत्नीसह हिंदू धर्मात प्रवेश करणार असल्याचं अली अकबर म्हणाले. मात्र दोन्ही मुलींना धर्मांतर करण्याची सक्ती करणार नसून त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

Latest Marathi News Updates: राजकीय पक्षांच्या दबावापोटी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला - राज ठाकरे

सायलीने गड राखला पण TRP मध्ये 'येड लागलं प्रेमाचं' ने मारली बाजी; झी मराठीच्या 'कमळी'ने सगळ्यांना टाकलं मागे, वाचा संपूर्ण रिपोर्ट

JJ Hospital Case: धक्कादायक! जेजे रुग्णालयात विद्यार्थिनीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, संतापजन कारण समोर

SCROLL FOR NEXT