director atlee wish jawan movie goes to oscar shah rukh khan SAKAL
मनोरंजन

Jawan: जवान सिनेमा ऑस्करसाठी निवडला जावा अशी दिग्दर्शक अॅटलीची इच्छा, म्हणाला, "शाहरुख खान सोबत..."

जवान सिनेमाने ऑस्कर गाजवावा अशी अॅटलीची इच्छा

Devendra Jadhav

Jawan for Oscar News: शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक यश मिळवलं. अजुनही जवान थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. शाहरुखचे फॅन असो वा नसो जवान पाहायला थिएटरमध्ये गर्दी होत आहे.

अॅटली जवानच्या माध्यमातुन तो दिग्दर्शक म्हणून काय कमाल करु शकतो हे दाखवलं आहे. अशातच जवान ऑस्करसाठी निवडला जावा, अशी अॅटलीची इच्छा आहे. काय म्हणाला अॅटली बघा.

जवान ऑस्करसाठी जाणार का? अॅटली म्हणाला..

'जवान' रिलीज होऊन आता २ आठवडे होतील. जवानच्या जबरदस्त कलेक्शनचा विचार करता, भारतातील पुढील पुरस्कार सीझनमध्ये हा सिनेमा जास्तीत जास्त पुरस्कार पटकावेल यात शंका नाही.

जवान पाहण्यासाठी भारतात नव्हे तर परदेशात सुद्धा प्रेक्षक गर्दी करत आहेत. जागतिक स्तरावर जवानला मिळालेले मोठे यश पाहता एका मुलाखतीत दिग्दर्शकाला विचारण्यात आले की,

शाहरुख खानचा चित्रपट अकादमी पुरस्कार ऑस्करच्या शर्यतीत असावा असे त्यांना वाटते का? त्याला उत्तर देताना अॅटली म्हणाले, "जर सर्व काही ठीक झाले तर, जवानने ऑस्करसाठी जावे नक्की जावे. मला वाटतं सिनेमातील प्रत्येकजण, दिग्दर्शक, प्रत्येक तंत्रज्ञ जो सिनेमात काम करतोय, त्यांची नजर गोल्डन ग्लोब्स, ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कार, अशा मानाच्या पुरस्कारावर असते. आमचंही तेच ध्येय आहे."

शाहरुख खानची इच्छा असेल तर... अॅटलीचं विधान

जवानच्या ऑस्कर एन्ट्री बद्दल अॅटली पुढे म्हणाला, "नक्कीच! मलाही जवानला ऑस्करमध्ये घेऊन जायला आवडेल. बघूया. मला वाटते शाहरुख खान सर ही मुलाखत पाहतील आणि वाचतील. मी त्यांना फोन करून विचारेन की, सर, हा चित्रपट ऑस्करमध्ये नेऊ का?"

अशाप्रकारे जवान सिनेमाने ऑस्करमध्ये एन्ट्री घ्यावी अशी दिग्दर्शक अॅटलीची इच्छा आहे. याविषयी तो शाहरुख खानशी सुद्धा बोलणार आहे. जवान ऑस्करला गेला तर भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

शाहरुख खानच्या जवानने बॉक्स ऑफीसवर केला रेकॉर्ड

शाहरुख खानच्या जवानने बॉक्स ऑफीसवर ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. जवान भारतात ४९३ कोटी कमाई केलीय.

याशिवाय जवानने जगभरातुन आतापर्यंत ८५८ कोटींची कमाई केलीय. जवानने बॉक्स ऑफीसवर १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT