director hemant dhome post for jhimma 2 and slam ranbir kapoor animal SAKAL
मनोरंजन

Hemant Dhome: "सगळ्या हिंसक पुरूष पात्रांच्या काळात...", हेमंत ढोमेने 'अ‍ॅनिमल'ला लगावला टोला?

हेमंत ढोमेने नवीन पोस्टच्या माध्यमातून 'अ‍ॅनिमल'वर निशाणा साधल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

Hemant Dhome Jhimma 2 News: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. अजुनही सिनेमा थिएटरमध्ये चांगलाच गाजतोय. 'अ‍ॅनिमल'च्या तोडीस तोड मराठी सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. तो म्हणजे झिम्मा 2.

हेमंत ढोमेने झिम्मा 2 चं दिग्दर्शन केलंय. झिम्मा 2 २०२३ मधील यशस्वी मराठी सिनेमांपैकी एक आहे. अशातच हेमंत ढोमेने झिम्मा 2 संबंधी एक नवीन पोस्ट केलीय. या पोस्टच्या माध्यमातून हेमंतने नकळतपणे रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' वर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

हेमंत ढोमेची नवीन पोस्ट चर्चेत

हेमंतने सोशल मीडियावर झिम्मा 2 मधील कलाकारांचा फोटो पोस्ट केलाय. यामध्ये झिम्मा 2 मधील प्रमुख कलाकारांचे सिनेमातले फोटो पाहायला मिळतात.

हे फोटो पोस्ट करुन हेमंत लिहीतो,"सगळ्या हिंसक पुरूष पात्रांच्या काळात प्रेम करणारा कबीर… अखेरच्या श्वासापर्यंत आयुष्य सुंदर करणारी इंदू… आपणंच घालून घेतलेली बंधंनं हळूहळू सैल करणारी निर्मला… नव्या रूपात नवं बाईपण जपणारी मनाली…

हेमंत पुढे लिहीतो, "हरवून मग स्वतःला नव्याने सापडलेली मिता… मैत्रीसाठी कोणाशीही दोन हात करणारी वैशाली… Unapologetically honest जगणारी कृतिका… घर सांभाळणारी, आपल्या माणसांवर प्रेम करणारी तानिया… ही सगळी पात्र तुम्ही आपली केलीत… कोणाला कोणीतरी आपली ताई, आई, मावशी, आत्या, मैत्रीण वाटली… कोणालातरी वाटलं आपणंच आहोत!"

हेमंत शेवटी लिहीतो, "तुमच्यातलं आणि पडद्यामधलं अंतर पुसून टाकणारी ही पात्र माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंद देणारी आहेत…

ही पात्र मेहनतीने, ताकदीने, कधी रूसत, कधी भांडत, कधी रडत, कधी हसत, कधी मस्ती करत… पण प्रेमानं मायेनं साकारणाऱ्या माझ्या या ८ कलाकारांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही पोस्ट! Love you all, तुम्ही माझी पात्र जिवंत करून Relatable केलीत!"

अनेक हिंदी सिनेमे रिलीज होऊनही मराठमोळ्या झिम्मा 2 सिनेमाने बॉक्स ऑफीसवर गाजवलंच शिवाय लोकांचं प्रेमही मिळवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT