Avatar The Way Of Water James Cameron  Esakal
मनोरंजन

James Cameron: कॅमेरुन जे करतो त्याचं सोनं करतो....टायटॅनिकला आठ पेक्षा जास्त ऑस्कर

सकाळ डिजिटल टीम

जेम्स हा एक सुप्रसिद्ध अमेरिकन चित्रपट निर्माता आहे ज्याने 'अवतार' आणि 'टायटॅनिक' सारख्या जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांसह 68 हून अधिक हॉलीवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९९७ मध्ये आलेला ‌"टायटॅनिक" हा चित्रपट कोणी विसरू शकत नाही आज पण तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. २००९ मध्ये आलेला 'अवतार' चित्रपट त्या चित्रपटा विषयी बोलावं तितकं कमी नाही पण असे भव्य चित्रपट तयार करणारे आहेत 'जेम्स कॅमेरॉन'..

"एलियन्स" (1986), "टायटॅनिक" (1997), आणि "अवतार" (2009) सारख्या जबरदस्त बॉक्स-ऑफिस हिटसह ऑस्कर-विजेता चित्रपट दिग्दर्शक म्हणून जेम्स कॅमेरॉनला ओळखले जाते. कॅमेरॉनचा सर्वात गाजलेला चित्रपट, “टायटॅनिक” हा एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट होता आणि त्याने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन आणि सर्वोत्कृष्ट चित्रासाठी अकादमी पुरस्कार मिळवले.

सर्वोत्तम फिल्म क्रिटिक्स सोसाइटी एवार्ड, बेस्ट फॉरेन लैंग्वेज फिल्म, नॅशनल बोर्ड ऑफ रिव्यू एवार्ड स्पेशल किटेशन फॉर दी यूज़ ऑफ स्पेशल इफेक्ट्स टेक्नोलोजी, सर्वोत्तम ऑनलाइन फिल्म क्रिटिक्स सोसायटी एवार्ड, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिका मोशन पिक्चर प्रोड्यूसर ऑफ दी ईयर एवार्ड, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी सॅटेलाइट पुरस्कार ,सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सॅटेलाइट पुरस्कार यासर्व पुरस्काराचा “टायटॅनिक” हा चित्रपट मानकरी ठरला.

जेम्स कॅमेरॉनलच एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एखाद्या भव्य चित्रपट तयार करणं आणि अनेक वर्षे गायब होऊन नवीन चित्रपटावर काम करणे. टायटॅनिक 1997 आला त्यानंतर २००९ मध्ये अवतार आला. या चित्रपटाने अनेक रेकॉर्डस बनवले. त्यानंतर प्रेक्षकांना त्याच्या दुसऱ्या पार्टची प्रतिक्षा होती. अवतारपासून 13 वर्षांच्या चित्रपट निर्मितीच्या अंतराने आता कॅमेरॉन अवतार चा सिक्वेल अवतार: द वे ऑफ वॉटर प्रदर्शित करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT