director kedar shinde facebook account and page hacked actor shared post and said be aware sakal
मनोरंजन

Kedar Shinde: सावध राहा! केदार शिंदे यांचे फेसबूक अकाऊंट हॅक..

सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असलेले लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांना मोठा फटका बसला आहे.

नीलेश अडसूळ

kedar shinde : 'जत्रा', 'अगं बाई अरेच्चा', 'खोखो' यांसारखे दर्जेदार चित्रपट आणि कित्येक नाट्यकृती, लोककला या माध्यमातून रसिकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या दिग्दर्शक केदार शिंदे यांना मोठा फटका बसला आहे. केदार शिंदे यांचे सोशल मीडिया वरील फेसबूक अकाऊंट आणि पेज हॅक करण्यात आले आहे.

(director kedar shinde facebook account and page hacked actor shared post and said be aware)

दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट, प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. ते सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे हजारो चाहते त्यांच्याशी सोशल मिडियावर संवादही साधत असतात. पण आज अचानक एक धक्कादायक बातमी समोर आली. केदार शिंदे यांचे फेसबूक अकाऊंट आणि पेज हॅक झाले आहे. यासंदर्भात केदार शिंदे यांनी इंस्टाग्राम अकाऊंट वरुन माहिती दिली आहे.

यामध्ये केदार शिंदे यांनी सावध रहा, सतर्क रहा असे आवाहन नेटकऱ्यांना केले आहे. ते म्हणतात, 'नमस्कार, काल रात्री माझे फेसबुक अकाऊंट (पर्सनल आणि पेज) हॅक झाले असून आता त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही… त्यामुळे जर या दोन्ही माध्यमांद्वारे तुमच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर कृपया सावध रहा आणि कोणत्याही प्रकारे रिप्लाय अथवा मेसेज करु नका! धन्यवाद!” अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT