मुंबई : साऊथ चित्रपटांच्या हिंदी रिमेकचा सध्या बॉलीवूडमध्ये बोलबाला आहे. विशेष म्हणजे साऊथचे हिंदी रिमेक चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिटही ठरतात. ‘कबीर सिंग’ चित्रपट याचेच एक उत्तम उदाहरण आहे.
दरम्यान सुपरहिट साऊथ चित्रपट ‘अरुंधती’ चा देखील हिंदी रिमेकची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान यात दीपिका ही मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
‘अरुंधती’ हा साऊथच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसली होती. आता दीपिकाच्या या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
web title : Discussion about the famous actress' name in Arundhati's Hindi remake
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.