Disha Patani  Sakal
मनोरंजन

Disha Patani: 'प्युअर ब्युटी', दिशा पटानीने बिकिनीतल्या फोटोमध्ये दाखवले स्ट्रेच मार्क्स

दिशाने या फोटोमध्ये तिचे स्ट्रेच मार्क्स लपवले नाहीत. तिने इन्स्टाग्रामवर ॲनिमल प्रिंट बिकिनीमधील एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे नवीनतम फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी अपलोड करत असते. आदल्या दिवशी, अभिनेत्रीने एक सेल्फी शेअर केला होता ज्यामध्ये तिचे स्ट्रेच मार्क्स देखील दिसत होते.

अनेक वापरकर्त्यांनी यासाठी तिला ट्रोल केले, तर दिशाच्या चाहत्यांनी स्ट्रेच मार्क्ससह 'अनफिल्टर्ड' मिरर सेल्फी शेअर केल्याबद्दल तिचे कौतुक केले.

खरं तर, आदल्या दिवशी, दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर प्रिंटेड बिकिनीमध्ये स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. अभिनेत्रीने तिच्या बाथरूममधलीही एक झलक दिली. हा सेल्फी क्लिक करताना दिशा तिच्या फोनकडे बघताना दिसत आहे. दिशाने फोटो पोस्ट करताना कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही.

दिशाने बिकिनीमधला फोटो पोस्ट करताच चाहत्यांनीही कमेंट करायला सुरुवात केली. फोटोवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, "दिशालाही स्ट्रेच मार्क्स आहेत! आता मी शांतपणे जगू शकते." तर एका चाहत्याने लिहिले, "आय लव्ह इट, दिस इज अनफ़िल्टर्ड. प्युअर ब्युटी"

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सूर्यासोबत दिसणार आहे. सिरुथाई शिवाचा चित्रपट 3D पीरियड ड्रामा असल्याचे म्हटले जाते आणि सध्या त्याचे नाव सुरिया 42 आहे. हा चित्रपट 10 भाषांमध्ये आणि दोन भागात बनवला जाणार आहे.

याशिवाय दिशा लवकरच 'प्रोजेक्ट के'मध्ये अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. दिशा करण जोहरच्या पुढील अॅक्शन चित्रपट 'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशि खन्नासोबत दिसणार आहे. हा चित्रपट आधी 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता पण आता तो 7 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT