Disha Patani Bollywood actress new boyfriend  esakal
मनोरंजन

Disha Patani New Relationship : दिशानं सांगितलं तिच्या आयुष्यातल्या खऱ्या 'टायगरचं' नाव!

सोशल मीडियावर तर दिशा आणि तिच्या नव्या बॉयफ्रेंडच्या नावाची मोठी चर्चा रंगली होती.

युगंधर ताजणे

Disha Patani Bollywood actress new boyfriend : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते त्या टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचं ब्रेकअप झालं आणि वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. गेल्या काही महिन्यांपासून दिशा आणखी कुणाला डेट करते आहे याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता त्याचे नाव समोर आले आहे.

सोशल मीडियावर तर दिशा आणि तिच्या नव्या बॉयफ्रेंडच्या नावाची मोठी चर्चा रंगली होती. एका पार्टीमध्ये दिशा तिच्या मित्रासोबत होती. त्याची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटोही व्हायरल झाले असून त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. त्या दोघांकडूनही अद्याप त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले नसले तरी नेटकऱ्यांनी मात्र त्यांचे नाव जोडण्यात सुरुवात केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

त्या पार्टीमधील तो व्हिडिओ समोर आल्यानंतर वेगळयाच चर्चेला उधाण आले आहे. त्यात ती ज्यामुळे यासगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे त्याची ओळख आपल्या मैत्रींणींना करुन देते. विशेष म्हणजे त्या पार्टीला टायगर देखील हजर असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

दिशानं अॅलेक्झांडर एलिक्सिकची बाकीच्यांना ओळख करुन दिली आहे.तो तिच्या सोबत पार्टीमध्ये होता. खरं तर टायगरनं यापूर्वी दिशा ही आपली चांगली मैत्रीण असल्याचे यापूर्वी सांगितले आहे. मीडियानं तिच्या आणि माझ्यामध्ये वेगळं नातं तयार केलं. असं टायगरनं कॉफी विथ करण शो मध्ये याविषयी सांगितलं होतं.

त्या व्हिडिओबाबत सांगायचे झाल्यास, दिशा तिच्या बाकीच्या मैत्रींणींना अॅलेक्झांडरची ओळख करुन देते. त्यावेळी ती त्यांना काही सांगताना दिसते. दिशा काय म्हणते हे कळत नाही. त्या व्हिडिओमध्ये तिचा आवाज काही येत नाही. मात्र चाहते आणि नेटकऱ्यांनी जे काही समजायचे ते समजून त्या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT