Disha Vakani Comeback On TMKOC  esakal
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'मी सांगतो, दयाबेन पुन्हा येणारच'! निर्मात्यांचा खुलासा

विनोदी मालिका म्हणून तारक मेहतानं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Disha Vakani Comeback On TMKOC : टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकेनं लोकप्रियतेचे उच्चांक गाठले त्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. आतापर्यत या मालिकेनं लहानांपासून ज्येष्ठांपर्यत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

विनोदी मालिका म्हणून तारक मेहतानं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, टप्पू यासारख्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत. अशातच गेल्या सहा वर्षांपासून दयाबेन फेम दिशा वकानी तारक मेहतापासून लांब आहे. ती पुन्हा या मालिकेत येणार अशा बातम्यांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या समोर आल्या आहेत.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी यावेळी मोठी बातमी दिली आहे. ती म्हणजे दिशा वकानी जी दयाबेन म्हणून प्रसिद्ध आहे ती पुन्हा तारक मेहतामध्ये दिसणार आहे. मी खात्रीनं सांगतो की, दयाबेन लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल असेही सांगण्यात आले आहे. यानंतर चाहत्यांनी दयाबेनवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वात सर्वाधिक टीआरपीची मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्माचे नाव घ्यावे लागेल. ही मालिका नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय राहिली आहे. या मालिकेची प्रेक्षकसंख्याही मोठी आहे. त्यातील पात्रं ही चाहत्यांच्या कुतूहलतेचा विषय आहेत. त्या पात्रांशी एक प्रकारचे भावनिक नाते चाहत्यांच तयार झाले आहे. त्यामुळे की काय, त्यातील कोणतेही पात्र मालिकेत न दिसल्यास चाहत्यांची निराशा होते.

दिशा वकानीनं २०१७ पासून मॅटर्निटी लिव्ह वर असल्याचे सांगून तारक मेहता का उल्टा चष्मामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. चाहते बऱ्याच दिवसांपासून आपल्या आवडत्या अभिनेत्रीची खूप उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. प्रेक्षकांनी देखील दयाबेन त्या मालिकेतून गेल्यापासून खूपच तीव्रपणे आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. जेठालाल आणि दयाबेन या मालिकेतील सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Light Bill Update: बापरे... ऑगस्टचं वीज बिल वाढणार! महावितरणचा घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही झटका; किती वाढणार बिल?

Sports Governance: भारतीय टेबल टेनिस महासंघ निलंबित; प्रशासनात मोठ्या त्रुटी असल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालयाची कारवाई

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी, अमित शहा संसदेत, लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात

Mumbai News: विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! इमारतीला आग; चिमुरड्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT