Divya Agarwal Wedding 
मनोरंजन

Divya Agarwal Wedding: बिग बॉस फेम अभिनेत्रीनं बिझनेसमॅनसोबत बांधली लग्नगाठ; शेअर केले विवाह सोहळ्याचे खास फोटो

Divya Agarwal Wedding: दिव्या आणि अपूर्व यांनी लग्न सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत . या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

priyanka kulkarni

Divya Agarwal Wedding: 'बिग बॉस ओटीटी' फेम दिव्या अग्रवालने (Divya Agarwal) बिझनेसमॅन अपूर्व पाडगावकरसोबत (Apurva Padgaonkar) लग्नगाठ बांधली आहे. अतिशय साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळ पार पाडला. दिव्या आणि अपूर्व यांच्या लग्नाला फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दिव्या आणि अपूर्व यांनी लग्न सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत . या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दिव्या आणि अपूर्वा यांचा लूक

दिव्या आणि अपूर्वाने त्यांच्या लग्नसोहळ्यात मॅचिंग कलरचे आउटफिट्स परिधान केले होते.जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिव्या खूपच सुंदर दिसत होती तर अपूर्वनं जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

दिव्याने तिच्या लग्नसोहळ्याचे 3 फोटो शेअर केले आहेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये अपूर्व हा दिव्याला मंगळसूत्र घाताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघे सात फेरे घेताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांकडे बघत आहेत.या फोटोला दिव्यानं कॅप्शन दिलं, 'या क्षणापासूनच आमची प्रेमकथा सुरु राहात आहे... रब रखा.'

प्रिंस नरूना, नायरा बनर्जी, अशनूर कौर, मनु पंजाबी आणि अर्चना गौतम यांनी दिव्यानं शेअर केलेल्या लग्न सोहळ्याच्या फोटोला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

जाणून घ्या दिव्याबद्दल...

दिव्या ही 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाची विजेती ठरली.'रागिनी एमएमस रिटर्न्स', 'कार्टेल' आणि 'अभय' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. तसेच 'स्प्लिट्सव्हिला' या कार्यक्रमामुळे दिव्याला विशेष लोकप्रियता मिळाली.

दिव्या काही वर्षांपूर्वी वरुण सूद यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले पण दिव्या आणि वरुण यांचा ब्रेकअप झाला. तसेच स्प्लिट्सविला या कार्यक्रमाच्या दरम्यान दिव्या ही प्रियांक शर्माच्या प्रेमात पडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

SCROLL FOR NEXT