divyanka tripathi file image
मनोरंजन

'माझं शरीर, माझी अब्रू 'नेटकऱ्यांवर दिव्यांका भडकली...

नुकताच घनश्याम नावाच्या एक नेटकऱ्यानं दिव्यांकाला ट्विटरवर टॅग करून प्रश्न विचारला.

प्रियांका कुलकर्णी

मुंबई - छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिव्यांका नेहमी देते. दिव्यांकाला सोशल मीडियावर अनेक जण ट्रोल करत असतात. दिव्यांकाने 'क्राइम पेट्रोल' या शोमध्ये काम केले आहे. या शो विषयी नुकताच घनश्याम नावाच्या एक नेटकऱ्याने दिव्यांकाला ट्विटरवर टॅग करून प्रश्न विचारला. या प्रश्नाला दिव्यांकाने तिच्या खास अंदाजामध्ये उत्तर दिले आहे. (divyanka tripathi hits back to troller who asked her why she does not wear dupatta in crime patrol)

घनश्यामने दिव्यांकाला ट्विटरवर प्रश्न विचारला, 'क्राइम पेट्रोलमध्ये तुम्ही ओढणी का घेत नाही?' त्यावर दिव्यांकाने उत्तर दिले,' मी ओढणी घेत नाही कारण तुमच्या सारखे लोक ओढणी न घेणाऱ्या मुलीचा देखील आदर करतील. कृपया तुम्ही तुमच्या आसपासच्या मुलांचे विचार बदला. मुलींच्या कपड्यांविषयी तुम्ही बोलू नका. माझ शरीर, माझी अब्रू, माझी मर्जी. तुमचे विचार तुमची मर्जी' दिव्यांकाने या नेटकऱ्याला दिलेल्या उत्तराचे सोशल मीडियावर सर्वांनी समर्थन केले आहे.

दिव्यांकाने एका मुलाखतीमध्ये ट्रोलर्सबद्दल तिचे मत व्यक्त केले होते. तेव्हा ती म्हणाली,'सगळे पुरूष सारखे नसतात. दिव्यांका सध्या 'खतरों के खिलाड़ी 11'या शोसाठी केपटाउन येथे गेली आहे. या शो च्या शूटिंगमधील फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT