divyanka tripathi file image
मनोरंजन

'बडे अच्छे लगते है २' मालिकेला दिव्यांकाचा नकार; सांगितलं 'हे' कारण

'बडे अच्छे लगते है' या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तंवर या जोडीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

स्वाती वेमूल

दिव्यांका त्रिपाठी ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्याआधीही विविध भूमिकांमधून दिव्यांकाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकतंच तिने पती विवेक दहियासोबत इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. दिव्यांकाला 'बडे अच्छे लगते है' या मालिकेच्या दुसऱ्या सिझनसाठी विचारण्यात आल्याची चर्चा होती. लाइव्हदरम्यान तिने मालिकेतील भूमिका नाकारल्याचं स्पष्ट केलं. नकार देण्यामागचं कारणसुद्धा तिने यावेळी सांगितलं. (Divyanka Tripathi reveals why she refused Bade Achhe Lagte Hain 2 slv92)

"होय, मला बडे अच्छे लगते है २ या मालिकेची ऑफर देण्यात आली होती आणि त्यासाठी मी लूक टेस्टसुद्धा दिला होता. पण मी मालिकेला होकार देऊ शकली नाही, कारण मी त्या भूमिकेशी स्वत:ला जोडू शकत नव्हती. मी जेव्हा एखादा प्रोजेक्ट हाती घेते, तेव्हा अक्षरश: मी भूमिकेशी लग्नच करते असं तुम्ही समजू शकता. मला जर भूमिका पटली नाही तर मी ती करत नाही. बडे अच्छे लगते है २ बाबत हेच झालं. ती भूमिका माझ्या मनाला पटत नव्हती आणि म्हणूनच मी नकार दिला", असं दिव्यांका म्हणाली.

यापूर्वी न साकारलेल्या भूमिकांना प्राधान्य देत असल्याचं दिव्यांकाने यावेळी स्पष्ट केलं. "मी अत्यंत वेगळ्या रुपात आणि भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकेन अशा एखाद्या मालिका किंवा चित्रपटाच्या शोधात मी आहे. आतापर्यंत मी फार हळव्या स्वभावाच्या व्यक्तीरेखा साकारल्या. पण आता मला आयएएस अधिकारी, वन अधिकारी किंवा खलनायिका साकारायला आवडेल. मला आव्हानात्मक भूमिका स्वीकारायच्या आहेत", असं तिने पुढे सांगितलं.

'बडे अच्छे लगते है' मालिकेची लोकप्रियता

'बडे अच्छे लगते है' या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तंवर या जोडीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ३० मे २०११ ते १० जुले २०१४ या कालावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि यादरम्यान मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT