दिव्यांका त्रिपाठी दिव्यांका त्रिपाठी इन्स्टाग्राम
मनोरंजन

दिव्यांकाने दयाबेनचा रोल करण्याबद्दल केला महत्त्वाचा खुलासा

दयाबेनच्या रोलसाठी दिव्यांकाच्या नावाची जोरदार चर्चा

दीनानाथ परब

मुंबई: सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचं (Divyanka Tripathi) नाव सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) मध्ये दिव्यांका दिसणार अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे. दिव्यांकाला 'तारक मेहता...' मालिकेत रोल ऑफर केल्याचं बोललं जातय. 'ये हैं मोहब्बते' आणि 'बनू मे तेरी दुल्हन' या दोन मालिकांमुळे दिव्यांकाला घराघरात ओळख मिळाली. (Divyanka Tripathi to play Dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashma Heres her response)

दयाबेनच्या भूमिकेसाठी दिव्यांकाशी संपर्क साधण्यात आल्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील दयाबेन हे सर्वाधिक लोकप्रिय पात्र आहे. जेठालाल आणि दयाबेनची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सुरुवातीपासून दिशा वाकानी हा रोल करत होती. तिने या रोलला एक वेगळं महत्त्व प्राप्त करुन दिलं.

एका दैनिकाशी बोलताना दिव्यांकाने या रोलबद्दल खुलासा केला आहे. "या सगळ्या अफवा आहेत. त्यात अजिबात तथ्य आणि सत्य नाहीय. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही एक चांगली मालिका असून त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मी या मालिकेत काम करण्याबद्दल फारशी गंभीर नाहीय. मी नवीन संकल्पना आणि नव्या आव्हानांचा विचार करतेय" असे दिव्यांका त्रिपाठीने स्पष्ट केले.

तीन वर्षांपूर्वी दिशा वाकानी या शो मध्ये दयाबेन म्हणून शेवटच्या दिसल्या होत्या. २०१७ मध्ये दिशा मातृत्वासाठी रजेवर गेल्या. त्यानंतर त्या मालिकेत परतल्यात नाहीत. दयाबेन पुन्हा परतणार म्हणून चर्चा होती. पण या बद्दल अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दिव्यांका नुकतीच दक्षिण आफ्रिका केपटाऊनमधून परतली. 'खतरो के खिलाडी ११' च्या शूटसाठी दिव्यांका तिथे गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वर्षाला फक्त ४ अनुदानित सिलिंडर? उज्ज्वला योजनेच्या नियमात केंद्र सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत; काय होणार परिणाम?

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या अन् Mumbai Indians यांच्या नेमकं काय सुरू आहे? जाणून घ्या Inside Story, सूर्या टीमसोबत राहणार का?

Latest Marathi News Update : बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

Talegaon MIDC Accident: तळेगाव एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपनीत फायर एक्सटिंग्विशर सिलींडर फुटून कार्बन डायऑक्साईड गळती; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी

IND vs AFG : विराट कोहलीची माघार, आता रोहित शर्माबाबत BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स, चाहत्यांना...

SCROLL FOR NEXT