deepika singh 
मनोरंजन

'बाई तू नाचू नकोस'; प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल

स्वाती वेमूल

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिया और बाती हम' या लोकप्रिय मालिकेत संध्याची भूमिका साकारून अभिनेत्री दीपिका सिंह घराघरात पोहोचली. ही तिच्या करिअरमधली पहिलीच मालिका होती आणि या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. दीपिका सध्या कोणत्या मालिकेमुळे नाही तर सोशल मीडियावरील तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत असते. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून दीपिका तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करू लागली आणि त्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले. मात्र या डान्सच्या व्हिडीओमुळे दीपिकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय. नुकताच तिने समुद्रकिनाऱ्यावर नाचतानाचा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

या कमेंट्समध्ये अनेकांनी तिला 'बाई तू नाचू नकोस' असा थेट सल्ला दिला आहे. तर काहींनी 'तुला नेमकं काय झालंय', असा उपहासात्मक प्रश्न विचारला आहे. दीपिकाला याआधीही तिच्या डान्सवरून ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती सातत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत असल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओला चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. 

२०१६ मध्ये 'दिया और बाती हम' ही मालिका बंद झाल्यानंतर दीपिका २०१८ मध्ये 'द रिअल सोलमेट' या वेब सीरिजमध्ये झळकली. २०१९ मध्ये तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. 'कवच' या मालिकेत तिने दुहेरी भूमिका साकारली होती. २०१४ मध्ये दीपिकाने दिग्दर्शक रोहित राज गोयलशी लग्न केलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

ChatGPT सांगणार कपडे तुमच्यावर कसे दिसतील? खरेदीआधीच पाहा लूक; असे वापरा 'Virtual Try-On' हे भन्नाट फिचर...

Latest Marathi News Live Update : विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची प्रकृती गंभीर; डॉ. भागवत कराड यांनी तत्काळ धाव घेत दिली वैद्यकीय मदत

SCROLL FOR NEXT