Kanika-Ankur Divorce:  Esakal
मनोरंजन

Kanika-Ankur Divorce: 'दिया और बाती' फेम 'मीना बिंदनी'च्या संसाराला लागली नजर! लग्नाच्या 11 वर्षानंतर घेणार घटस्फोट?

Vaishali Patil

TV actor Kanika Maheshwari  Divorce: 'दिया और बाती हम' ही टीव्ही मालिका खुप लोकप्रिय झाली. या मालिकेतील मीनाक्षी विक्रम राठी ची भुमिका साकारणारी कनिका हिने तिच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

ती अल्पावधीतच मीना बिंदनीच्या भुमिकेने खुप लोकप्रिय झाली. आता कनिका माहेश्वरी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कनिका आणि तिचा पती यांच्यात मतभेद सुरु असून लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत दोघेही कायदेशीररित्या घटस्फोट घेणार आहेत. कनिका आणि अंकुर हे दोघेही चार वर्षांपासून वेगळे राहत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तीन महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

कनिका आणि अंकुरला 8 वर्षांचा मुलगा आहे ज्याचे नाव नानक आहे कनिका तिचा ८ वर्षांचा मुलगा नानक मुंबईत तर अंकुर दिल्लीत राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांनी आपले नाते वाचवण्याचा खुप प्रयत्न केला मात्र ते अपयश ठरले. मात्र, याबाबत अद्याप कनिकाने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

तर तिचा पती अंकूरने या वृत्ताचे खंडन केले आहे. मिडियासोबत बोलताना तो म्हणाला की, "नाही, या फक्त अफवा आहेत आणि त्या पसरत राहतात कारण आम्ही लांब राहत आहोत. मी माझ्या कामामुळे दिल्लीत राहतो, तर कनिका मुंबईत आहे."

कनिका आणि अंकुर 2013 मध्ये सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए'मध्ये एकत्र दिसले होते. यासोबतच या दोघांनी काही शॉर्ट फिल्म्सही बनवल्या आहेत आणि काही वेब सीरिजही केल्या आहेत. कनिका 'दिल दियां गल्लान'मध्ये शेवटची दिसली होती. मात्र आजही बरेच चाहते तिला मीना बिंदनीच्या भुमिकेसाठीच ओळखतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT